भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणासोबतही करू आघाडी – इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

मुंबई : देशातून भाजपाला हद्दपार करायचे आहे. यासाठी कोणासोबतही आघाडी करण्याची वेळ आली तरी आम्ही करू, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी अमरावती मनपात एमआयएम – शिवसेनेने सोबत येण्याबाबत दिली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत की, अमरावती महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत एमआयएमने शिवसेनेसोबत युती केली हे खरे आहे. स्थानिक पातळीवरील गणिते वेगळी असतात. यामध्ये वरिष्ठ स्तरावरील नेत्यांचा काही संबंध नसतो. विकासकामे करत असताना कुणाची मदत घेऊ शकतो, याचा विचार स्थानिक पातळीवरील नेते करत असतात. अमरावतीच्या या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणं योग्य वाटले असेल. भाजपाला दूर ठेवण्यासाठी कुणाशीही आघाडी करायची वेळ आली तर आम्ही नक्कीच ती आघाडी करण्यासाठी तयार आहोत. भाजपा सत्तेत येऊ नये, हेच आमचे धोरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER