… घेऊ डुक्कराच्या मांसातील जिलेटिनची लस, जमात-ए-इस्लामीने बदलली भूमिका

Vaccine

दिल्ली : करोना (Corona) प्रतिबंधक लसीतील घटकांवर आक्षेप घेऊन लस घेण्यास नकार देणाऱ्या भारतातील मुस्लिम संघटनांनी आता ही आपल्या भूमिका बदलली आहे. आपत्कालीन परिस्थितीत ‘हराम’ घटकांपासून बनवलेली लसही जीव वाचवण्यासाठी आम्ही घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.

जमात-ए-इस्लामी (हिंद) शरिया परिषदेचे सचिव डॉ. रजी-उल-इस्लाम नदवी याबाबत म्हणालेत, काही अस्वीकारार्ह घटक वेगळ्याच परिस्थितीत आणि रुपात उपलब्ध असतील तर ते पवित्र आणि वैधही ठरतात. याच आधारावर डुक्कराच्या मांसातील जिलेटिनचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसीला इस्लामी कायदेतज्ज्ञांनी मंजुरी दिली आहे. ज्या इस्लामी कायदेतज्ज्ञांना हा बदल स्वीकारार्ह नाही त्यांनी देखील, जोपर्यंत ‘हलाल’ लस तयार होत नाही, तोपर्यंत आपत्कालीन परिस्थितीत अस्वीकारार्ह पदार्थांपासून बनवलेली लस घेता येईल, असे म्हटले आहे.

याआधी डॉ. नदवी म्हणाले होते की, “सध्या करोना प्रतिबंधित लसीमध्ये मिळालेल्या पदार्थांबाबत जी माहिती उघड झाली आहे. त्याला मान्यता दिली जाऊ शकत नाही. लसीतील घटक माहिती झाल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.”

भारतासह इस्लामिक देशातील अनेक इस्लामी संघटनांनी करोनाच्या लसींना ‘हराम’ म्हटले होते. यात युएई आणि इंडोनेशियातील संघटनांचाही समावेश आहे. भरतात ऑल इंडिया सुन्नी जमियत-उल-उलेमा काउन्सिल आणि मुंबईतील रझा अकादमीने देखील लसीला हराम म्हटले होते. डुक्करांच्या चरबीपासून बनवलेल्या लसीचा वापर मुस्लिमांनी करु नये, असे आवाहनही त्यांनी केले होते.

दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca), फायझर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) या परदेशातील लस निर्मिती कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या लसींमध्ये डुक्कराचा कुठलाही घटक मिसळलेला नाही. मात्र, साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि प्रभावी ठेवण्यासाठी डुक्करापासून काढलेल्या जिलेटिनचा वापर करण्यात येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER