बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करूया : पृथ्वीराज चव्हाण

pritvhiraj Cahvhan & Balasaheb Thorat

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहोत. मात्र, त्यातूनही आपल्याला काँग्रेला बळकट करायचं आहे. काँग्रेसला बळकट करण्यासाठी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचेही हात बळकट करायचे आहेत, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुंबईत सांगितले.

सातारा जिल्ह्यातील रणजितसिंह देशमुख शिवसेनेतून स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. मुंबई येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी पक्षात प्रवेश केला. रणजितसिंह देशमुखांच्या पक्षप्रवेशावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करूया असे आवाहन केले. पृथ्वीराज चव्हाण हे देश पातळीवरील नेते आहेत.

आम्हाला त्यांच्या मार्गदर्शानाची गरज असल्याचे ना. थोरात यांनी स्पष्ट केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आमच्याकडून रणजितसिंह देशमुख यांच्यावर अन्याय झाला असल्याचे यावेळी मान्य केले. देशमुख हे अत्यंत तडफेने काम करतात. रणजितसिंह यांचे काँग्रेसमध्ये स्वागत करताना काँग्रेस पक्ष बळकट करायचा असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER