…तर ओबीसींच्या न्यायासाठी महामोर्चे काढू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Vijay Waddetiwar

नागपूर : आपल्या न्यायहक्कासाठी सर्व समाज शक्ती दाखवत आहेत, गरज भासल्यास ओबीसींचीही (OBC)शक्ती काय आहेते पण दाखवू. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असा इशारा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) दिला आहे. नागपुरात त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा. सध्या एक लाख पदांचा ओबीसींचा अनुशेष बाकी आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केला. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून सर्व पदभरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे, असा इशारा देत ओबीसींच्या मुद्द्यावर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार पुन्हा आक्रमक झाले आहेत.

ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको, ओबीसींच्या मागण्यांवर वडेट्टीवारांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठ्यांवरही आगपाखड केली होती. मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी केला होता. तसेच जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मत मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER