पुन्हा एकदा आपल्या एकजुटीचा व लढाऊपणा दाखवू या, महाराष्ट्र दिनानिमित्त पवारांचे आवाहन

Maharashtra Today

मुंबई : १ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य अस्तित्वास आलं. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सध्या देशासह महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या एकजुटीची व लढाऊ बाण्याची प्रचिती देऊया (Let’s show our unity and fighting once again), असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

देशातील सर्वात प्रगतीशील व पुरोगामी विचारांचे राज्य असलेला आपला महाराष्ट्र नेहमीच देशाच्या विकासात्मक जडणघडणीत अग्रेसर राहिला आहे. आज राज्य एका वैश्विक आपदेशी लढत असताना पुन्हा एकदा आपल्या एकजुटीची व लढाऊ बाण्याची प्रचिती देऊया. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे शरद पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राने संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button