अठरापगड जातीचे मावळे गोळा करून ओबीसी आरक्षण वाचवू- प्रकाश शेंडगे

Prakash Shendge

सांगली :  फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच सर्व राजे एकत्र येणार असतील तर आम्हीदेखील अठरापगड जातीचे मावळे जमवून ओबीसी आरक्षणाचे रक्षण करू, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. (Prakash Shendge on OBC Reservation) महाराष्ट्रात आरक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. अठरापगड जातींचे आरक्षण हडप करण्याचा, त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप शेंडगे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

ते म्हणालेत, मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आमचे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जातो आहे.
१३ टक्क्यांसाठी इतरांचे हाल

राज्यात सर्व ७५ टक्के नोकर भरतीच्या प्रक्रिया थांबल्या आहेत. ओबीसी समाजाच्या नोकऱ्यांवर आणि हक्कावर गदा आणली जात आहे. १३ टक्के मराठ्यांसाठी ८७ टक्के एससी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील नागरिकांचे हाल सुरू आहेत, असा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.

फडणवीसांनी मराठा आरक्षण दिले आणि टिकवले; हे सरकार खोडा घालते : शिवेंद्रराजे

कुणी मान्य करा अथवा नका करू. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले आणि टिकवले; पण हे सरकार आरक्षणात खोडा घालते आहे, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER