करू या असुरक्षिततेची तोडफोड !

करू या असुरक्षिततेची तोडफोड !

मागचे वर्ष संपून नवीन वर्ष सुरु झाले. काही गोष्टी हा एका पानावरुन पुढच्या पानावर अशाच सुरू राहतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे स्त्री आणि मुली यांच्या बाबत असलेली असुरक्षितता. ज्याप्रकारे बलात्कारासारख्या घटना मागच्या वर्षी होत होत्या पुढेही चालू आहेत आणि चालू राहतील. याच्यामध्ये कारण काय हा खूपच वेगळा पण महत्त्वाचा प्रश्न आहे.

स्त्रीचे पुढे जात राहणं आता अपरिहार्य आहे मग स्वतःचे संरक्षण करत करत स्वतःला वाचवत आपला मार्ग शोधून काढतात तरुणींना खंबीरपणे आणि सजगपणे वावरण्याची गरज आज पडते.

कोणी बस स्टॉप वर उभे असताना, कुणी सुरक्षारक्षका कडून, कुणी कुरिअरिवाल्याकडून किंवा लिफ्ट मध्ये, नाहीतर डिलिव्हरी बॉय किंवा गॅस वितरण करणाऱ्या कडून एवढेच काय तर शिक्षकांकडून, किंवा स्वतःच्या जन्मदात्या वडीला कडून एक वस्तू म्हणून वापरली जाते. या प्रत्येक ठिकाणी तिची चूक नसते, ती बेजबाबदारपणे वागत नसते, किंवा बेसावध नसते. एकाकी असतेच असे नाही .उलट तिने अंगभर कपडे घातलेले असतात. प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये, सार्वजनिक बाथरूम मध्ये, मॉलमधील ट्रायल रूम मध्ये कॅमेरे नाही ना याची उलट सतत काळजी घ्यावी लागते.

अलीकडे तर स्त्रियांना भेडसावणारा त्रास सायबर संबंधातील गुन्हाचा असतो. इंटरनेटवर अश्लील फोटो बनवून टाकणे, अनोळखी मोबाईल क्रमांक वरून अश्लील मेसेजेस पाठवणे असे अनेक प्रकार केले जातात ते सायबर गुन्ह्यांमध्ये मोडतात.

एकूणच स्त्री ही आपल्या देशात कधी सुरक्षित करू शकणार नाही का? असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादी व्यक्ती किती विकृत आहे? ती विकृती कशी बाहेर पडेल हे कळू शकत नाही .खरतर स्त्री देहाकडे कसं बघावयाचे संस्कार तेराव्या चौदाव्या वर्षाचे असल्यापासूनच होत असतात. नव्या भावना संवेदना जागृत होतात. कुठेतरी मुलांनाही कळतं की असं राजरोसपणे बघायचं नसतं. चोरून बघताना हळून नजरेचा सरावतात आणि नंतर मात्र त्यांना आपला तो जणूकाही जन्मसिद्ध हक्कच आहे असं वाटू लागतं. पुरुष लिंग हे जर तत्त्व असेल तर ते जन्मसिद्ध म्हणून अधिकारही जणू जन्मसिद्ध असा समज होऊन जातो. मग त्याला अधिकाराला साध्या ओळखीची ही गरज लागत नाही. मग प्रेम वगैरे तर दूरच. पुढे पुरुष शरीरात टेस्टोस्टिरोंन नावाच्या हार्मोनीमुळे लैंगिक व्यवस्था घडते ,पुरुष देहाची बाह्य रचनाही बदलते, दाढी मिशा वगैरे शिवाय लैंगिक आकर्षण निर्माण होते .आणि मग आक्रमकता, पॉवर हे सगळं हार्मोनमुळे घडत असं पुरुष ठरवून टाकतात. मग विनयभंग किंवा बलात्कार या हार्मोनची पातळी मुळेच घडतात असं वाटायला लागतं .परंतु हे फोल आहे .मध्यातरी याविषयी झालेल्या एका अभ्य्यासावरील माहिती वाचनात आली. यासंदर्भातील वैज्ञानिकांनी काही अभ्यास केला,तो असा की त्यांनी या हार्मोनची रक्तातली पातळी आणि बलात्कार निवृत्ती यामध्ये काही कार्यकारण संबंध तपासण्यासाठी अनेक प्रयोग केले या प्रयोगांमध्ये असा संबंध आढळला नाही . म्हणजे पुरुषी आक्रमकता ही मूलभूत म्हणजे जैविक नाही. म्हणून वाढताना कळत नकळत झालेल्या हा केवळ संस्कार आहे आणि हीच एक गोष्ट खरंतर खूप दिलासा देणारी आहे. तो संस्कार असल्याने काढून टाकता येतो, कितीही जुना झाला तरी !

परंतु अलीकडच्या काळात स्त्री शक्ती, स्त्री प्रतिमा उंचावते आहे. कधी ती जास्त शिकलेली असते, कधी मोठ्या पदावर असते, कधी जास्त कमावती असते, कधी जास्त बॅलन्स असते, आणि मग हिची सक्षमता पेलणे किंवा त्याची प्रशंसा करणे पुरुषांच्या अहंकाराला जड जात असावे.

परंतु या दृष्टिकोनामुळे स्त्री स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे थांबवेंल असे नाही. संकट येताहेत, येत राहतील परंतु त्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही .कारण समाजात या भोवती असलेल्या या असुरक्षिततेच्या वातावरणाची तोडफोड स्त्रियांना सक्षम आणि खंबीर बनुन करावी लागेल. आणि मुख्य म्हणजे पोलिसांच्या यंत्रणा आणि तिच्या संरक्षणासाठी असलेल्या योजना माहिती करून घेऊन त्याचा लाभ करणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

स्त्री जन्मा प्रवासाला बाहेर पडते मग तो प्रवास टॅक्सी रिक्षा बस ट्रेन कशाचाही असेना, तू आता सुरक्षित नाही. मुंबई पोलिसांनी याविषयी अनेक उपाययोजना केल्या आहेत िक्षा किंवा टॅक्‍सीत बसताना त्याचा क्रमांक नोंदवून घ्यायला हवा. बरेचदा प्रत्येक रिक्षा मध्ये प्रवासी बसतात त्याच्यासमोर स्मार्ट ट्रॅफिक कार्ड लावलेले असतं . रिक्षा चालकांची संपूर्ण माहिती पोलीस हेल्पलाईन क्रमांक असतो. तोही नोट करून घ्यावा. एकट्याने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी मुंबई पोलिसांनी एक एसएमएस सेवा सुरू केली आहे .टॅक्सी रिक्षात बसल्यावर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाईल नंबर वर फक्त एसएमएस करायचा .हा मोबाईल जीपीएस प्रणालीवर काम करतो जेणेकरून तुमच्या प्रवास स्थानाची नियंत्रण कक्षात नोंद राहते. त्याचप्रमाणे हा आपल्या नातेवाईकांनाही कळवून ठेवता येतो .तसेच टॅक्सी प्रवासादरम्यान कुठलीही तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील क्रमांकांवर किंवा हेल्पलाईनवर संपर्क करता येतो .जेणेकरून त्यावर भाडे नाकारणे किंवा इतर कारवाईही होऊ शकते. इंटरनेट हे विकृतीचे जाळ आहे. काही विकृत लोक इंटरनेटवर अयोग्य चित्रण करून स्मार्टफोनमुळे असे फोटो व्हिडिओ व्हाट्सअप वर लगेच पाठवतात .आपल्या आजूबाजूला किंवा ट्रेनमध्ये असं काही चित्रण होत नाही ना यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे .असं कोणी आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वे पोलिसांकडे करू शकता किंवा हेल्पलाईन वर पण संपर्क साधू शकता .कॅमेरे असलेले मोबाईल वापरायला लागल्यापासून अनेक गंभीर आयुष्य उद्ध्वस्त करणारे गुन्हे घडायला लागले. म्हणूनच असे काही क्षण किंवा खाजगी मधले काढलेले सेल्फी आयुष्याचा भात करू शकतात .मोबाईल जर चोरीला गेला तर छायाचित्रांचा गैरवापर होतो असे फोटो काढून नंतर ते मेमरी कार्ड मधून डिलीट जरी केले तरी त्यातील 90 टक्के डेटा घरबसल्या पुढेही परत मिळवू शकतो .त्यामुळे त्याचा वापर जपून करायला पाहिजे.

प्रत्येक स्त्रीला जरी आर्थिक स्वातंत्र्य आहेच, पण मोठे व्यवहार करताना आपल्या कुटुंबियांना किंवा जवळच्यांना विश्वासात घ्यायला हवे त्या विषयी माहिती त्यांना द्यायलाच हवी .बरेचदा वर्तमानपत्रातील किंवा इंटरनेट वरील जाहिराती पाहून आर्थिक व्यवहार केला जातो आणि फसगत होण्याची शक्यता असते. म्हणजेच महिला जरी स्वयंपूर्ण असल्या, स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम असल्या तरी त्यांना संभाव्य धोका ही ओळखता यायला हवा .स्त्रियांसाठी मोठ्याप्रमाणात कायदे आहेत, सवलती आहेत .पण मुळात त्याची माहितीच त्यांना नसते. कुणी त्रास देत असेल त्यांनी सहन करतात राज्यात सर्वत्र स्त्रीयांना कुठल्याही प्रकरणी तक्रार करायची असल्यास १०० राज्यभर सर्वत्र संकटकाळी या क्रमांकावर संपर्क केल्यास पाच ते दहा मिनिटात मदत पोहोचू शकते. हे जरी आपत्कालीन परिस्थिती साठी असलेले पण जर एखाद्या गुन्ह्याची तक्रार करायची असेल तर आता पोलिस ठाण्यातही जायची गरज नाही एक फोन केला तरी महिला पोलीस साध्या वेशामध्ये घरी येऊन तक्रार नोंदवून घेतात.

म्हणूनच सजग राहून आता या असुरक्षिततेच्या भिंतीची तोडफोड करूया.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER