मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकू : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje

कोल्हापूर : न्यायिक स्तरावर टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाच्या माध्यमातूनही दबाव टाकू, असे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित न्यायिक परिषदेत खा. संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. यानंतर आता पुढे काय ? यावर  विचार करून निर्णय घेण्यासाठी कोल्हापुरात सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील वकिलांची न्यायिक परिषद झाली. न्यायिक परिषदेत उपस्थित केलेले मुद्दे सुप्रीम कोर्टात आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलापर्यंत पोहचते करू, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी दिली.

न्यायिक परिषदेत करण्यात आलेले ठराव :

  • सुप्रीम कोर्टामध्ये कोल्हापूर सकल मराठा समाजाच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ नेमणे.
  • महाराष्ट्र शासन व राज्यपाल यांच्या माध्यमातून १०२ व्या घटनादुरुस्तीप्रमाणे ३४२ प्रमाणे मराठा जात सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय यादीमध्ये समाविष्ट करावी.
  • एमपीएससी व इतर राज्य सरकारच्या नोकरीसाठी सर्वांची  वयोमर्यादा दोन वर्षे वाढवून द्यावी.
  • महाराष्ट्र सरकारच्या व खासगी शैक्षणिक संस्था यामध्ये झालेल्या प्रवेशांना संरक्षित करावे.  त्यासाठी आवश्यक त्या जागा वाढवाव्यात तसेच आर्थिक तरतूद (आवश्यक असल्यास) करावी तसेच OBC च्या आनुषंगिक व तत्सम लाभ मराठा समाजाला मिळावे.
  • SEBC च्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश करून नवीन यादी राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावी, याकरिता राज्यपालांची भेट घेणे.
  • ५० टक्के आरक्षण कोटा काढून टाकण्याबाबत राज्यघटनेत दुरुस्ती करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेने विशेष सत्र बोलावून ठराव करावा व तो कायदेमंडळास व पंतप्रधानांना पाठवावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणे.
  • आरक्षणाचा लढा हा SEBC चा असावा.  आपण EWC मध्ये समाविष्ट होऊ नये, EWमध्ये समाविष्ट झाल्याने कदाचित सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER