राजकारण बाजूला सारत कोरोनाशी एकत्रित लढू; चंद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

Uddhav Thackeray-Chandrakant Patil

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली कोरोना (Corona) महामारीची समस्या कमी होताना दिसत नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभरात कोरोनावर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसलं आहे. ग्रामीण भागातही कोविड रुग्णांची वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे राजकारण बाजूला सारून सर्व राजकीय पक्षांनी आणि संस्थांनी एकजूट होऊन या महामारीविरुद्ध लढा देण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि या परिस्थितीत सातत्यपूर्ण काम करणाऱ्या काही प्रमुख सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, भारतीय जैन संघटना, इस्कॉन, टाटा ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हिंग इत्यादी असे आपण सर्वजण एकत्रितपणे परिस्थितीचे विश्लेषण करणे, यावरील उपाययोजना ठरविणे आणि कामाची वाटणी करणे हे खूप आवश्यक आहे.

सध्याचे संकट ध्यानात घेऊन दोन हजार लोकसंख्येच्या गावातही ऑक्सिजन बेडसह (Oxygen bed) सुसज्ज रुग्णालय उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सुविधा निर्माण करताना तेथे वैद्यकीय, निमवैद्यकीय व पूरक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. वैद्यक क्षेत्राच्या विविध शाखांचे डॉक्टर्स, वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी, परिचारिका, वॉर्डबॉय अशा एक लाख जणांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्याची गरज आहे- अशी मागणीही त्यांनी केली आहे.


ही बातमी पण वाचा : …पण राज्य सरकारकडून शिक्षक दिनी ना त्यांचे कौतुक, शुभेच्छा ना आदर्श पुरस्कार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER