केंद्र व राज्यसरकारच्या मदतीचे माप शेतकऱ्यांच्या पदरात टाकू : शरद पवार

Sharad Pawar

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने एक वर्षाचे नुकसान होते, मात्र या ठिकाणच्या शेतातील माती खरडून गेल्याने दहा वर्षाचे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्यसरकारच्या मदतीचे माप शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठी शर्तीने प्रयत्न करणार आहे. नुकसान भरपाईसाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटणार आहे. भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीत हजारो माणसे दगावली. त्यातून आपण सावरलो आहोत. मात्र शेतीतील नुकसान भरपाई करण्याची ताकद राज्य सरकारची नाही. त्याला केंद्र सरकारची मदत आवश्यक आहे. भूकंपात जागतिक बँकेच्या वतीने केंद्र, राज्य व विदेशातून मदत मिळवून दिले आहेत. आणि नागरिकांना मदत केली त्याच धर्तीवर शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येईल आपण खचून जाऊ नये संकट मोठे आहे. आपण एकजुटीने संकटावर मात करू असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तुर, राजेगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकाची आज त्यांनी पाहणी केली. सास्तुर चौरस्ता येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, शेत शिवारात नजर टाकताना असे दिसून आले की या ठिकाणी दोन प्रकरचे नुकसान झाले आहे. ज्यांचे सोयाबीन शेतात होते ते पाण्यात गेले तर ज्यांनी काढून गंजी उभी केली त्या गंजी वाहून गेल्या प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पंतप्रधान यांना बोलून देश व राज्य सरकारची मदत देण्यासाठी भाग पाडू असे ते म्हणाले. या ठिकाणी असलेल्या ऊस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेले ऊस आडवा पडला त्याची विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीच भरून न येण्यासारखे नुकसान झाले आहे.

राजेगाव येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, शेतीची अर्थ व्यवस्था उद्धवस्त करणारे हे संकट आहे दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई यांचे नुकसान आपण भरून काढू शकतो मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची अवजारे वाहून गेलीत, ठिबक वाहुन गेली पेरणीसाठी लागणारे साहित्य नाहिशे झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले, अनेकांनी घरे खचली, त्यामुळे या ठिकाणच्या नुकसानीचे स्वरूप विदारक आहे. त्याचा आढावा घ्यावा शेतकऱ्यांशी संवाद साधावा म्हणून मी आलो असल्याचे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER