कोल्हापूरचे विमानतळ अव्वल बनवू : आ. ऋतुराज पाटील

Ruturaj Patil

कोल्हापूर : कोल्हापुरातील (Kolhapur) उजळाईवाडी विमानतळ भारतातील नामांकित विमानतळ पैकी एक बनवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नाईट लँडींगसह विस्तारीकरणाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही. कामात ज्या काही उणिवा निर्माण होतील, त्या सर्व दूर करून विमानतळाची सर्व कामे पूर्ण केली जातील, असे आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) स्पष्ट केले.

उजळाईवाडी येथील कोल्हापूर विमानतळास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन विमानतळावर सुरू असलेल्या विस्तारीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग, धावपट्टी, विविध शहरांना सुरू झालेल्या विमानसेवा प्रवाशांचा प्रतिसाद व प्रस्तावित तसेच सध्या सुरू असलेल्या कामांची तपशीलवार माहिती घेतली. विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या 64 एकर जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करून जमिन संपादनासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया बालाजी इंफ्राटेक चे शंभुराजे मोहिते विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER