भाजपाच्या ४०व्या स्थापना दिनी भारताला कोरोनामुक्त करण्याचा मोदींचा संकल्प

नवी दिल्ली :- आज भारतीय जनता पार्टीचा 40वा स्थापना दिवस आहे. देश सध्या कोरोना विषाणुच्या विळख्यात सापडल्याने देशाला या विषाणुपासून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युद्ध स्तरावर प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या स्थापनादिनी सुद्धा त्यांनी देशाला कोरोमामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

भाजपा स्थापना दिवस  साजरा करताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना देशातील परिस्थितीची जाणिव करून देत मदतीचे आवाहनदेखील केले आहे. कोरोनामुळे देशबंदी असल्याने अनेक मजूर, गोरगरीबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून समाजातील गरजूंना कार्यकर्त्यांनी मदत करावी असे मोदींनी सांगितले आहे.
भाजपा स्थापनादिनी पंतप्रधान मोदींनी पक्षाची स्थापना करणा-या सर्व वरीष्ठ, ज्येष्ठांचे आभार मानले. तसेच, पक्ष नेते, कार्यकर्ते यांचेही मोदींनी आभार मानले.  तर,  भारताच्या लोकशाहीला ख-या अर्थाने पूढे नेणारा भाजप हा खरा पक्ष आहे असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
भाजपाचे नवे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षस्थापनादिनी सर्व कार्यकर्त्यांनी आज एक वेळच्या जेवणाचा त्याग करावा असे आवाहन केले आहे.
तर, भाजपा हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा पक्ष आणि सर्वात मजबूत आधारस्तंभ बनला आहे असे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.