जाणून घेऊया अध्ययनाविषयी

Let's learn about the study

मुल शिकत कसं याविषयी आपण विचार करतोय. आपण समजतो त्या प्रकारचे अध्ययन आणि अध्यायनाचा खरा अर्थ यात किती फरक आहे हे काल आपण बघितलं. मला पूर्वीच्या गुरु गृहांची आठवण झाली. गुरूंच्या घरी राहून विद्यार्थी जे अध्ययन करत ते केवळ पुस्तकी ज्ञान नव्हते तर पाणी भरणे, लाकडे फोडणे, आश्रमाची स्वच्छता इतर अनेक कामे त्यांना करावी लागत. वनस्पतींची हे ऋषीमुनीओळखहि  जंगलातून फिरवून करून देत असत. ऐकायला खूप छान वाटतं पण यात कठोर तप होतं. त्यामुळे कणखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्व बनवून विद्यार्थी बाहेर पडत.

अध्ययन आपल्या दैनंदिनजी वनाचा एक याप्रकारे भाग असला तरीही आपल्याला माहित असलेल्या प्रत्येकच गोष्टी आपण शिकलेल्या नसतो. काही क्षमता किंवा कौशल्य अनुवंशिक असतात किंवा निसर्गतः असतात असेही म्हणता येईल. डोळ्यात कचरा गेला तर डोळ्यांची होणारी उघडझाप, डोळ्यातून येणारे पाणी. म्हणजे अध्ययन मोजताना त्या व्यक्तीची कृती बघितली जाते. ज्ञान, क्षमता व विचार यामध्ये अनुभवावर आधारित तुलनात्मक दृष्ट्या कायम स्वरूपाचा बदल घडवून होणारी किंवा त्यावर प्रभाव पाडणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन असेही म्हणता येईल. हा बदल आजारपण, दुखापतीमुळे किंवा परिपक्वतेतून आलेला नसतो.

फ्रेंड्स ! तुम्हाला काय वाटतं? नवीन जन्माला आलेल्या कोंबडीचे पिल्लू दाणे टिपायला लागतं किंवा छोट्याशा बाळाच्या गालाला स्पर्श केला तर ते बाळ आपले डोके त्या स्पर्शाच्या दिशेने वळवून तोंड उघडतो मग हे अध्ययन किंवा शिकणे आहे का ? तर नाही. ही आहे फक्त रिफ्लेक्स ॲक्शन. त्याचा संदर्भ आपण पुढे बघणार आहोतच.

काल आपण बघितल्याप्रमाणे सराव म्हणजे “सवय संपादन “ही अध्ययनाची सगळ्यात सोपी पद्धत आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला फार हार्मफुल नाही हे लक्षात येते तेव्हा आपण त्याच्याशी जुळवून घेऊ लागतो. अक्षरशः अशा रीतीने आपण आपली शक्ती वाचवून इतर महत्त्वाच्या उद्दीपक यांना प्रतिक्रिया देण्यासाठी वापरतो. (Habituation)
एखाद्या व्यक्तीचे वागणे आपल्याला जरी थोडे त्रासदायक वाटते. पण नंतर तीच वागण्याची पद्धत बघून आपल्याला त्याची सवय होते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. शिवाय वाचलेली ऊर्जा इतर महत्त्वाच्या कामांना वापरायला लागतो. म्हणजे या वर्तणुकीशी परिचित होतो मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे आपण नकळत” हे किती महत्वाचे बरे ?”हा विचार करीत असतो.

ही बातमी पण वाचा : पुस्तकी शिक्षण म्हणजे अध्ययन ?

वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या माधुरी मावशी स्वतःच्या लॅपटॉप वर ईमेल्स पाठवतात,, स्वीकारतात किंवा नेट बँकिंग व्यवहार करतात हे आपण कालच्या लेखात बघितल्याप्रमाणे “ट्रायल अँड एरर” पद्धतीतूनच होते.

आई-वडिलांच्या गुण अवगुण सवयी यांचे अनुकरण मुले हमखास करतात .हे अध्ययन नेहमी आदर्श मानलेल्या व्यक्तीच्या वागणुकीचे निरीक्षण करूनच होते ,याला “निरीक्षणात्मक अध्ययन.” (Obervational learning ) म्हणतात. अतिष आईबरोबर एका दुकानात गेला .आईला अतिष चा मामे बहिणी साठी गिफ्ट द्यायचे होते .तेव्हा दुकानात पाऊल ठेवताक्षणी अतिष ने एक तरी खेळणे घेण्यासंबंधी हट्ट सुरू केला. पण आईने आज अजिबात खेळणे घ्यायचे नाही असे ठरवलेले होते .कारण अफाट खेळणी घरात जमा झालेली होती. तेव्हा अतिष ने एवढा धिंगाणा सुरू केला, शेवटी आईने त्याला उचलून घेऊन कसेतरी दुकानाबाहेर आणले. आता आधीच्या वागण्यामागे किंवा तिच्या आईच्या कोणत्या वागणुकीमुळे हा प्रसंग उद्भवला? असे प्रसंग व्यवहारांमध्ये कायम घडत असतात. अतिषला कळले की थोडा रडलं किंवा हट्ट, थयथयाट केला की लाजेकाजेस्तव आई खेळ घेऊन देते. म्हणजे रडलो की खेळणी मिळतात आणि आई ही त्याच्या रडणे या धिंगाण्याला बळी पडते ,ठाम पणे नाही म्हणू शकत नाही. हे त्याला पक्कं माहीत झालेल आहे.

एकूणच मानवाचे वर्तन हे आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनातून आणि त्याला येणाऱ्या अनुभवातून शिकलेलं असतं या अध्ययन प्रक्रियेच्या( conditioning) मुळाशी असलेल्या प्रक्रिया म्हणजे क्लासिकल काँडिशनिंग आणि ऑपरंट काँडिशनिंग.

आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे तान्ह्या बाळाच्या गालाला स्पर्श केला तर ते तोंड उघडून चोखण्याची क्रिया करते. की आपण मागे बघितल्याप्रमाणे केवळ रिफ्लेक्स अँक्शन आहे पण हळूहळू त्या गालाच्या स्पर्शाशी इतर क्रिया, म्हणजे आईची येण्याची चाहूल, आईचे उचलून घेणे त्यांनी जरी घडले तरी बाळ तोंड उघडून चोखण्याची क्रिया करते. आता गालाला स्पर्श झालेला नाही ही तरीही आईच्या चाहुलीने बाळ चोख्ण्याची क्रिया करते. यालाच “क्लासिकल काँडिशनिंग” असे म्हणतात.

किंवा मुलांना बाबांबरोबर खेळायला खूप आवडतं. त्यामुळे नंतर बाबांच्या गाडीचा आवाज ऐकला तरीही त्यांना आनंद होतो. आणि पुढे तर फक्त बाबांचा हॉलिडे (म्हणजे त्यांचे घरातले अस्तित्व) हे देखील मुलांना आवडू लागते. म्हणजे बाबांचे खेळणे ,आवडणे या उद्दिपकाशी संबंधित गाडीचा आवाज किंवा बाबांची सुट्टी हे खरं पाहिलं तर न्यूट्रल उद्दीपक आहेत. पण त्या क्रियांशी या वस्तूंचा संबंध जोडलेला आहे म्हणून त्याला “क्लासिकल कंडिशनिंग “असे म्हणतात .म्हणजे बाबा घरी येणार किंवा घरी राहणार आणि ते आपल्याशी खेळणार ही त्यांना झालेली जाणीव.

बरेचदा मुलांना परीक्षेचा ताण येतो. वास्तविक बघता तो ताण किंवा माहिती परीक्षेचे नसतेच तर त्यानंतर आई-वडिलांची जी अपेक्षा असते ती पूर्ण होऊ शकणार नाही, ते रागवतील, नाराज होतील किंवा शेजारी टीका करतील याची भीती मुलांना वाटत असते.

दुसरा प्रकार आहे ओपरंट कंडिशनिंग. यात स्किनर ने प्राण्यांवर प्रयोग करून ट्रायल अँड एरर ने बरोबर कृती आणि बक्षीस, चुकीची कृती आणि शिक्षा अशाप्रकारे प्रयोग केला.

याचा उपयोग मुलांची किंवा व्यक्तीची अध्ययन किंवा कार्यक्षेत्रातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा वर्तणुकीची संबंधीचे प्रश्न (बिहेविअरल प्रॉब्लेम्स) सोडवण्यासाठी याची मदत होते.

बरेचदा मुलांना शाळेत प्रोजेक्ट करावे लागतात. मुले अगदी वेळेवर याची माहिती आईला देतात आणि मग शाळेत शिक्षा होऊ नये म्हणून रडतात शाळेत जात नाही वगैरे गोष्टी घडतात अशा वेळी एखादी आई कायम मुलांना पाठीशी घालून स्वतः सगळे प्रोजेक्ट करून देते. यामुळे मुलांना तशीच वेळ लागते.

आजकाल सगळ्याच ठिकाणी मुलांच्या वर्तन समस्या वाढीस लागलेल्या आहे. खोटे बोलणे, वस्तू चोरणे, मारामारी करणे, उलट उत्तरे देणे, वस्तू जागेवर ठेवणे या सगळ्यासाठी या अध्ययन प्रक्रियेतील क्लासिकल आणि ऑपरंट काँडिशनिंग चा वापर करून उपाय करता येतात. आपल्याला हवी असणारी वागणूक वाढवण्यासाठी किंमत ते परत परत होण्यासाठी संबंधित घटक देणे. उदाहरणार्थ छोट्या छोट्या मुलगी, जेव्हा जेव्हा हा खेळणी आवरून ठेवते त्यावेळी तिचे बाबा तिला खाऊ देतात. किंवा हवे असलेले वागणे व त्याची वारंवारिता वाढवण्यासाठी वा टिकवण्यासाठी ऋणात्मक घटक काढून टाकले. म्हणजे स्वातीचे रुममेट बरोबर नेहमी वादावादी होते. ती होऊ नये असे स्वातीला वाटते म्हणून ती त्यांचे किचन आवरून ठेवते. बरेचदा एखाद्याच्या वागण्याला प्रोत्साहन किंवा अटेंशन मिळाले नाही की ते वर्तन किंवा कमी कमी होत जाते. आपण वर बघितल्याप्रमाणे आतिषच्या आक्रमकतेकडे जर त्याच्या आईने दुर्लक्ष केले असते, तर त्याचा हळूहळू बंद झाला असता.

फ्रेंड्स एकूणच मूल शिकत कसं किंवा एकूणच अध्ययन, नवीन कौशल्य आत्मसात कशी होत जातात? त्यांना त्याला योग्य कामासाठी प्रोत्साहन कसे येता येते किंवा अयोग्य कृती पासून दूर कसे करता येते यासाठी अध्ययन प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER