चला बिग बॉसच्या घरात जेथे मॉल आहे, थिएटर आहे आणि स्पा सुध्दा

शनिवार 3 ऑक्टोबरपासून बिग बॉस 14 सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणेच सलमान खान(Salman Khan) या शोचा होस्ट असून त्याला यासाठी किती पैसे मिळणार आहेत ते आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितले आहे. मात्र केवळ सलमानच नव्हे तर यात भाग घेणाऱ्यांनाही यावेळी गेल्या वेळेपेक्षा जास्त पैसे दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोमध्ये प्रख्यात राधे मां (Radhe Maa) भाग घेणार आहे. मात्र राधे मां आपल्या त्रिशुळविना शोमध्ये भाग घेण्यास तयार नसल्याने तिला सगळ्यांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. राधे मां ला बिग बॉससाठी प्रत्येक आठवड्याला 25 लाख रुपये दिले जाणार आहेत.

 राधे मां सोबत या शो मध्ये छोट्या पडद्यावरील एक लग्न झालेले जोडपे, टीव्ही मालिकांमधील दोन लोकप्रिय सुना, एक खलनायिका, मालिकांमधील दोन लोकप्रिय पुत्र, दोन गायक, रियालिटी शोमधील काही चेहरे आणि पंजाबी, हिंदी आणि साऊथच्या चित्रपटांमधील काही कलाकार दिसणार आहेत. या सगळ्यांना शोमध्ये भाग घेण्यापूर्वी गोरेगावच्या एका हॉटेलमध्ये क्वारटाईन करण्यात आले होते. त्यानंतरच यांना बिग बॉसच्या घरात पाठवण्यात आले.

या कलाकारांमध्ये शगुन पांडे, नेहा शर्मा, प्रतीक सहजपाल, नैना सिंह, ‘छोटी बहू’ मालिकेतील रुबीना, ती एकटीच नव्हे तर पति अभिनव शुक्लासोबत बिग बॉसमध्ये भाग घेणार आहे. अभिनेता शार्दुल पंडित, टॉप मॉडेल इंडियामधील शहजाद देओल, जस्मिन भसीन, निशांत मलकानी. पवित्रा पुनिया आणि फिटनेस ट्रेवर प्रतीकही यात दिसणार आहे. प्रतीक आणि पवित्रा पती-पत्नी असून बिग बॉसमध्ये भाग घेणारी ही दुसरी वास्तव जीवनातील पती-पत्नीची जोडी आहे.

बिग बॉसने (Bigg Boss) लॉकडाऊन लक्षात घेऊन यावेळी घरात अनेक नवीन बदल केलेले आहेत. यावेळी प्रथमच बिग बॉसच्या घरात, थिएटरपासून डायनिंगपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून घरात बंद असलेल्या स्पर्धकांच्या भावनांशी प्रेक्षक जोडले गेले आहेत. त्यामुळेच हा शो प्रत्येक सीझनमध्ये लोकप्रियतेचा उच्चांक गाठक असतो.

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना आता सिनेमाचा आनंदही घेता येणार असून यासाठी घरात 75 मीमी व्हर्च्युअल थिएटर तयार करण्यात आला आहे. याशिवाय एक मॉलही तयार करण्यात आला असून या मॉलमध्ये स्पर्धकांना मनपसंद खरेदी करण्याचा अनुभव घेता येणार आहे. स्पर्धक घरात कंटाळत असल्याने त्यांच्यासाठी स्पाची योजनाही या घरात करण्यात आली आहे. मात्र हा स्पासुद्धा व्हर्च्युअल आहे बरं का? 3 ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री साडे दहा वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री नऊ वाजता बिग बॉसचे प्रसारण केले जाणार आहे.

ही बातमी पण वाचा : ट्रोलमुळे सलमान जेव्हा बिग बॉस सोडणार होता, तेव्हा सलमान या कारणामुळे थांबला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER