सिनेमागृहांचे पुनर्जीवितास प्राधान्य देवू : ना. थोरात

Balasaheb Thorat

मुंबई : मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहांचे (Cinemas in Maharashtra) पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, अशी ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thora) यांनी दिली. महाराष्ट्र चित्रपट-रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांगितले.सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. थोरात म्हणाले, मराठी सिनेमा गावागावात पोहोचणे आवश्यक असून यास प्रयत्न होणे गरजेचे आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण ठरत असताना या सगळ्या बाबींचा विचार करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ज्ञांकडून ठोस सूचना घेण्यात येणार आहेत.

मराठी सिनेमा, कला,नाट्य आणि साहित्य क्षेत्र प्रचंड समृद्ध आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमाबरोबर आज मराठी सिनेमा स्पर्धा करीत असतो. मराठी सिनेमा निर्मिती, दिग्दर्शित करणारे खूप प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून अनेक संकटांना सामोरे जाऊन वेगळी कलाकृती तयार करण्याचे धाडस दाखवतात याचा आनंद वाटतो. येत्या काळातही आपल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या कलाकृती निर्माण कराव्यात, याकरिता महाविकास आघाडीचे शासन आपल्या पाठीशी आहे, असेही महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले.

ना. अमित देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कला क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आल्या तरी सरकार या क्षेत्राला उभारी देण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घेत आहे आणि यापुढेही घेत राहील. कला क्षेत्रातील सर्वच दिग्गजांना शासन सर्वतोपरी मदत करेल.

सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा यांनी या चर्चा सत्रानंतर सूचनांच्या आधारे प्राप्त झालेल्या धोरणाबाबतचा मसुदा तयार करावा. हा मसुदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडून, त्यांच्या अंतिम सूचनांसह या क्षेत्राला उभारी देऊ, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER