पूजाला न्याय मिळेपर्यंत लढा देऊ; शांताताई राठोड यांचा निर्धार

Shantatai Rathod

पुणे :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी गडावर शक्ती प्रदर्शन करून, या प्रकणात मला गोवण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप केला. यावर संताप व्यक्त करताना पूजाच्या नातेवाईक शांताताई राठोड (Shantatai Rathod) म्हणालात, राठोड यांचा हा सोहळा बंजारा समाजाची दिशाभूल करणारा आहे. जोपर्यंत पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा मी सुरू ठेवणार आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही पूजाच्या त्यांनी केली.

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज सोळा दिवस झाले मात्र तिच्या मृत्यूमागचे नेमक कारण स्पष्ट झाले नाही. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि वनमंत्री संजय राठोड पंधरा दिवसानंतर पोहरादेवी गडावर वृत्तमाध्यमांपुढे आले, मोठे शक्तिप्रदर्शन करून या प्रकणात मला गोवण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप केला.

शांताताई राठोड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, पूजाला न्याय मिळाला नाही, तर मंत्रालयावर धडक आंदोलन करू. यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळ वळण लागले असून हे प्रकरण आणखी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातील अनेक विरोध पक्षातील नेत्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

घटना

पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी होती. ती एक TikTok स्टार होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते होते. आपली इंग्रजी चांगली नाही म्हणून ती इंग्रजी शिकण्यासाठी पुण्यात आली होती. पुण्यात आल्यानंतर दोन आठवडेही झाले नसतील तोच तिने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीच्या बाल्कणीतून उडी घेवून आत्महत्या केली.

तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झालय. त्यातील संवादावरून पूजाचे मंत्र्यांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला आहे. हा कथित मंत्री शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आहे, असा आरोप विरोध पक्षांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER