सर्व मिळून फडणवीसांशी लढू, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांचे विचारमंथन

Ashok Chavan - Uddhav Thackeray - Anil Deshmukh - Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई : आज राज्यमंत्री मंडळाची बैठक संपल्यावर सभागृहातून सर्व अधिकारी बाहेर गेलात आणि नंतर कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरकारवर कोसळलेल्या फडणवीस अस्त्राचा सामना कसा करायचा यावर चर्चा केली. ठरले, फडणवीसांविरुद्ध सर्वांनी एकत्र लढले पाहिजे.

सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरण, परमवीर सिंग (Parambir Singh) यांचे पत्र, रश्मी शुक्ल यांचे गुप्त पत्र आणि भाजपाच्या आरोपांची मालिका हे सर्व मुद्दे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार याची सर्वांना कल्पना होती. मंत्रिमंडळ बैठकीचे शासकीय कामकाज पूर्ण झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि सचिव यांना मंत्रिमंडळ बैठकीच्या हॉलमधून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. शिवसेना (Shiv Sena) , राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) सर्व मंत्र्यांची पुन्हा बैठक सुरू झाली. गेल्या आठवडाभरात भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत भूमिका घ्यावी, याविषयी चर्चा झाली. भाजपला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा असे मंत्र्यांचे मत होते, अशी माहिती आहे.

बैठकीनंतर मंत्र्यांमध्ये खालील विषयांवर चर्चा झाल्याचे कळते –

अधिकाऱ्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. फोन टॅप होत असतील तर काम कशी होतील? अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उघडं पाडले पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे.

काही संवाद –

अशोक चव्हाण (Ashok Chavan) (सार्वजनिक बांधकाम मंत्री) – आपण काम कस करणार, फोन टॅप होतात. असे होत असेल तर बाब गंभीर आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) – आपण एकत्र लढलो पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढले पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना उघडं पाडले पाहिजे. आपण अधिका-यांना ओळखण्यात कमी पडतो आहे? अधिका-यांवर विश्वास ठेवायचा कसा?

अनिल देशमुख (Anil Deshmukh) – माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. मी पैशांचा व्यव्हार केला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER