विद्यापीठाचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करू : नूतन कुलगुरू डॉ. शिर्के

Vice Chancellor Dr. Shirke

कोल्हापूर :- शिवाजी विद्यापीठाचा (Shivaji University) समृद्ध शैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (Dr. Shirke) यांनी आज येथे केले. मुंबई येथील महाराष्ट्र राजभवनातून डॉ. शिर्के यांच्या निवडीची घोषणा आज सायंकाळी करण्यात आली. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. शिर्के बोलत होते.

ही बातमी पण वाचा : डॉ. दिगंबर शिर्के शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरु

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये अध्यापक, विभागप्रमुख, विविध अधिकार मंडळांवर सदस्य, कुलसचिव आणि प्र-कुलगुरू आदी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या विश्वासाने सोपविण्यात आल्या, त्यांना सर्वोतोपरी न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे, अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनी आहे. याच कृतार्थ भावनेतून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विद्यार्थीहितासाठी माझी ही कारकीर्द समर्पित राहील, याची ग्वाही देऊ इच्छितो. आपल्या शिवाजी विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनविण्याच्या कामी समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER