करू या मैत्री हार्मोन्सशी

Hormons

चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या सुलभा ताईंची सतत छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड होते तर कधी विनाकारण रडू येत. अठरा वर्षाचा सुजित बरेचदा अधून मधून जगज्जेता असल्यासारखा वावरायला लागतो. मेघा तिच्या लठ्ठपणामुळे नेहमी काळजीत असते. डॉक्टरांकडे गेल्यावर बऱ्याचदा शारीरिक व मानसिक अस्वस्थतेचे कारण हार्मोनल इंबॅलेन्स आहे, असं डॉक्टर सांगतात.

काय आहे बरं हे नेमकं ?

हार्मोन्स म्हणजे विशिष्ट ग्रंथींमधून रासायनिक संश्लेषणांसाठी निर्माण केल्या गेलेली काही रसायन, यामुळे काही विशिष्ट इन्द्रिय आणि पेशी यांच्या हालचाली, कार्ये नियमित आणि नियंत्रणात राहतील. शरीरात मुळात इंडोक्राइन ग्रंथीमधून हार्मोन्स उत्सर्जित होतात. त्याच्याखाली काम करणाऱ्या इतर ग्रंथी म्हणजे हायपोथालामस, शरीराचे तपमान, तहान, झोप, भूक आणि मूड तसेच भावनांचे संतुलन राखणे हे कार्य करते, तर पिनियल ग्रंथी झोपेवर परिणाम करणारी असून सेरोटोनिनच्या मुळ स्वरूपा पासून मेलाटोनिन निर्मितीचे कार्य करते. पॅरा थायरॉईड शरीरातील कॅल्शिअम कंट्रोल करते तर पिट्युटरी या ग्रंथीला” मास्टर कंट्रोल ग्रंथी “म्हणतात कारण की सर्व ग्रंथींवर नियंत्रण ठेवून हार्मोन्सची निर्मिती करून शरीराच्या वाढीला आणि विकासाला हातभार लावते. प्रत्येक ग्रंथीचे काही एक महत्त्वाची कार्य आहेतच. परंतु काही सामान्य अशी महत्त्वाची

कार्य म्हणजे :-

 • फूड मेटॅबॉलिझम *वाढ आणि विकास. *भूक आणि तहान यावर नियंत्रण *शरीराचे तापमानावर नियंत्रण *मूड्स आणि बोधात्मक विकास घास यावर नियंत्रण *लैंगिक विकास आणि पुनरुत्पादन क्षमता राखणे. ही काही ही सर्वसामान्य महत्त्वाची कार्य ! असं जरी असलं तरी प्रत्येक ग्रंथी आणि त्यातून स्त्रवणारा हार्मोन याला विशिष्ट महत्त्व आहेच. यापैकी काहींचा कार्य अविरत सुरू असतं तर काहींचा सुरुवात आणि थोड्या वेळात प्रक्रियेचा शेवट असे चालते.
 • # डॉक्टर जेव्हा थायरॉईड चेक करायला सांगतात त्यावेळेला त्यातून T 3. T 4 हे चेक करायला सांगतात ही दोन हार्मोन्स आहेत, जी चयापचय नियंत्रण करण्यास मदत करतात आणि वजनाचा समतोल, शरीराचे तापमान, त्याचप्रमाणे कार्यक्षमता, केस व त्वचा यांचे आरोग्य ठरत असते.
 • # पेंक्रियाज या पोटाच्या बाजूला असलेल्या पानासारख्या भागातून स्त्रावणारे इन्शुलीन हे कर्बोदका पासून मिळणारे ग्लूकोज पदार्थाच्या साखरेचा शक्तीसाठी वापर करणे आणि त्याचा साठा करून ठेवणे. हे काम करते त्याचप्रमाणे साखरेचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वा कमी होणार्या आजारापासून दूर ठेवणे हे काम करते.
 • # प्रोगेस्टेरोन या ओव्हरीज मध्ये निर्माण होणाऱ्या स्त्रावाचा प्रेग्नेंसी मध्ये खूप महत्त्वाची भूमिका असते. मासिक पाळी नियमित करून गर्भधारणेस मदत आणि जर pregnancy राहिली नाही तर प्रोगेस्टरोने पातळी आपोआप खाली जाते आणि नियमित मासिक पाळी सुरू होते. लैंगिक इच्छेवर या हार्मोन्सचा परिणाम होतो. त्याच प्रमाणे हे हार्मोन झोप चांगली येण्याला, तसेच चिंता ,चिडचिड कमी करून मूड्स मधले बदल स्थिर ठेवण्याला मदत करते. प्री मेनोपोजल काळात याची पातळी कमी होते. जंक फूड सॅच्युरेटेड फॅट्स साखर ताण-तणाव टाळून व्यायामातील सातत्य टिकवले तर त्रास होत नाही.
 • # इस्ट्रोजेन हे स्त्रियांमधील हार्मोन्स असून ते “हॅपी हार्मोन “म्हणूनही ओळखले जाते. याची निर्मिती ओवरीज मध्ये होते. स्त्री जीवनातील सगळ्या टप्प्यांवर परिणाम करते. प्रेग्नेंसी, मेनोपॉज किंवा नियमित पाळी यासाठी ते जबाबदार असते. हे जास्त प्रमाणात स्त्रवलं तर स्त्रीमध्ये ब्रेस्ट आणि युटेरस कॅन्सर हा धोका संभवतो. याशिवाय डिप्रेशन मुडीनेस दिसून येतो. व याची लेवल कमी झाली तर केस गळणे, मुरूम, जाड स्किन हे त्रास होतात. हे हार्मोन सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी सुद्धा मदत करते, ज्यामुळे मूडस् चा समतोल राखल्यास जातो.
 • # टेस्टोस्टेरोन हे पुरुषांमधील सेक्स हार्मोन आहे. पुरूषांमधील पुनरुत्पादन करणाऱ्या पेशींचा विकास करण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. मसल्स हाड यांचे वजन वाढवून एकूण शरीर आणि केसांची वाढ होते. प्रोटीन सिंथेसिस मधून मसल्स आणि इन्शुलिन साठी उद्दीपन या क्रिया साधल्या जातात. याचा समतोल असेल तर शार्प माईंड, आत्मविश्वास, आनंदीपणा जाणवतो मात्र प्रमाण कमी असल्यास लठ्ठपणा वाढणे, अल्जाइमरचा, निराशेचा त्रास होतो सतत थकवा जाणवतो..
 • # मेलाटोनिन आपल्या झोपेची सायकल नियमित करण्यास हे हार्मोन असून याला हार्मोन ऑफ डार्कनेस म्हणतात. सूर्यास्त पासून सूर्योदयापर्यंत हेच ठरवण्याचा प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे लवकर झोपून पहाटे लवकर उठणे हे आरोग्याला उपकारक ठरते. दुर्दैवाने टीव्ही, व्हॉट्सऍप, फेसबूक हे झोपेचं खोबरं करतात. ते संध्याकाळनंतर टाळायला पाहिजे.
 • # सेरोटोनिन हे नैसर्गिक feel good रसायन ! मूड चांगला करण्यासाठी तर ते उपयुक्त आहेस पण शिकणे ,लक्षात ठेवणे ,पचन आणि काही स्नायूंची कार्य, त्याच प्रमाणे झोपेचं नियंत्रण यामुळे होते. त्याची पातळी खाली गेल्यास निराशा, मायग्रेन, वजन वाढ, झोप न येणे, सारखं खावस वाटणे. विशेषतः कार्बोहाइड्रेट. त्यामुळेच त्याचा वापर अँटीडीप्रेसंट म्हणून केला जातो. नैसर्गिक रित्या हे वाढवण्यासाठी जलद चालणे, पळणे, शारीरिक व्यायाम किंवा कुठल्याही हालचाली असणारा खेळ याशिवाय ओमेगा 3 आणि अमायनो ऍसिड असलेला आहार याचा समतोल राखण्यास उपयोगी पडतो. दूध तेही विशेषता झोपताना, तसेच तूप, नट्स, कार्बोहायड्रेट्स हवेच.
 • # कॉर्तीसोल हे हार्मोन अँडरिनल ग्रंथीमध्ये उत्पन्न होते. शरीर हे ऊर्जावान राहण्यासाठी त्याचप्रमाणे ताणापासून सुटका होण्यासाठी उपयोगी. धोकादायक परिस्थिती मध्ये, हार्ट रेट, बीपी, श्वासोश्वास परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शरीर, ताणाच्या परिस्थितीत कॉर्तीसोल उत्पन्न करते. याची हाय लेव्हल जर असेल तर सतत होणारे अल्सर उच्च रक्तदाब चिंता कोलेस्ट्रॉल वाढणे या गोष्टी होतात तर याची लेव्हल जर आवश्‍यकतेपेक्षा कमी झाली, अल्कोहोलीजम, क्रोनिक थकवा जाणवतो.
 • # अँडरेनालीन हे अंडरेनल ग्रंथीतील मेड्युला तसेच काही सेंट्रल नर्वस सिस्टम च्या न्यूरॉन्स मध्ये आढळते. हे “आपत्कालीन ( इमर्जन्सी )हार्मोन आहे”. व्यक्तीला ताणाच्या परिस्थितीवर, तात्काळ विचार करून ताबडतोब प्रतिसाद देण्यासाठी मदत करण्यात पुढाकार असतो म्हणून याला आपत्कालीन हार्मोन असं म्हणतात. तांडा या परिस्थितीमध्ये अंड्रेनील स्त्रवून रक्तात मिसळते आणि विशिष्ट प्रतिक्रिया देण्याला इंद्रियांना उद्दीपित करते.
 • # ग्रोथ हार्मोन याचा मानवाच्या विकासात महत्त्वाचा सहभाग आहे. हे मुळात एक प्रथिनांचे हर्मोन असून 190 अमिनो आम्ल नी युक्त असते.
 • #ऑक्सिटोसिन याला” लव हार्मोन्स” समजले जाते.अर्थातच याचा उपयोग आयुष्यामध्ये भावनिक स्नेहसंबंध निर्माण करण्यासाठी आणि नाती जपण्यासाठी होतो. हे संतुलित राहण्यासाठी योगा प्रॅक्टिस, रिलॅक्सेशन, जवळच्या लोकांबरोबर एकत्र जेवण, मसाज, एखादा छंद जोपासण याचा उपयोग होतो.
 • # डोपामाइन हे देखील “फील गूड”असे हार्मोन, न्यूरोट्रान्समीटर आहे. एखाद्या गोष्टीविषयी खुषी, आनंद, शाब्बासकी, बक्षीस याशी संबंधित असलेलं पण तरीही अतिशय गुंतागुंतीचं रसायन. न्यूरोलॉजिकल व शारीरिक कार्यात सहभागी महत्त्वाचा घटक असून मोटर फंक्शन, मूड स्टॅबिलायझर, अगदी निर्णय प्रक्रिया यांच्याशी हे निगडीत असून याशिवाय काही हालचाली आणि मानसिक आजारांशी सुद्धा ते संबंधित आहे. जेव्हा मेंदू खुश होतो तेव्हा हे रिलीज होते. एखाद्या कामापासून, कृती पासून आनंद मिळतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात डोपामाइनची पातळी वाढते. मग आवडता पदार्थ, शॉपिंग, छंद. समजा स्वयंपाक घरात चॉकलेट केक बनतो आहे. त्यावेळी त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो आणि ओव्हन मधे आपण बघतो ही. तेव्हा मेंदूमध्ये पातळी वाढते आणि जेव्हा खातो तेव्हा पुढेही असाच आनंद मिळावा म्हणून मनात इच्छाही निर्माण होते म्हणजे ही एक प्रकारची सायकल आहे. प्रेरणा —-: बक्षीस —: परत प्रोत्साहन ..! डोपामाइन याशिवाय रक्ताभिसरण वचन कार्यशीलता हृदय किडनीचे कार्य एकाग्रता स्मरण याविषयी कार्य करते. डब्बा माईंची योग्य पातळी मूड उल्हासित करते ही पातळी शिकण्या मध्ये नियोजनामध्ये आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणारी असते.

डोपामाईन हे एकटे काम करत नाही ते इतर न्यूरो ट्रान्समीटर व हार्मोन्सची मदत घेत असते जसे की सेरोटोनिन अँडरेनल इ. डोपामाईनची कमतरता झाली तर झोप जास्त येणे किंवा न येणे, सावधानतेचा अभाव, एकाग्रतेचा, सुसंगतीचा, प्रेरणा आणि उत्साहाचा अभाव जाणवतो. त्याचप्रमाणे हालचालींच्या सुद्धा अडचणी येतात. आणि जर जास्त डोपामाइन ची पातळी वाढली तर व्यक्ती स्वतःला सध्या जगाच्या वरती उच्च समजू लागते, मॅनिया चा अटॅक येतो, भास आणि भ्रम देखील होऊ शकतो. bया सगळ्या हार्मोन्सशी मैत्री करायची असेल, कायम त्यांचा समतोल राखायचा असेल तर योग्य आहार आणि सुदृढ जीवनशैली याला पर्याय नाही.

 • प्रत्येक जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात म्हणजे 20 ते 30 ग्रॅम प्रत्येक जेवणात घ्यावे.
 • जास्त किंवा खूप कमी खाणं टाळावं. साधारण कमीत कमी एका दिवशी बाराशे कॅलरीज घेणे आवश्यक.
 • विटामिन डी थायरॉईड च्या कार्यक्षमतेसाठी, बी सिक्स हे पाळीसंबंधी तक्रारींसाठी, b3 हे स्ट्रेस दूर करण्यासाठी, त विटामिन E हे मेनॉपोजल प्रॉब्लेम साठी उपयुक्त ठरते.
 • साखर आणि रिफाइंड कार्बोहाइड्रेट पासून दूर राहणे.
 • ताणाचे नियोजन करायला शिकणे. त्यासाठी मेडिटेशन योगा मसाज म्युझिक ऐकणे.
 • नियमित व्यायामाला पर्याय नाही. त्यामध्ये एरोबिक्स, वॉकिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग. यांचा समावेश दररोज हवा.

फ्रेंड्स ! शारीरिक आणि मानसिक आरोग्य हवे असेल तर म्हणूनच या हार्मोन्सशी मैत्री करू चला !

ही बातमी पण वाचा : ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER