शेतकऱ्यांसोबत मातोश्रीवर करू आंदोलन; राणा दांपत्याचा इशारा

Cm Thackeray-Ravi Rana

अमरावती : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आ. रवी राणा (Ravi rana) यांनी काल (शुक्रवारी) गुरुकुंज मोझरी येथे तुकडोजी महाराज समाधीस्थळी दोन तास ‘रास्ता रोको’ (Rasta Roko)आंदोलन केले. पोलिसांनी राणा यांच्यासह शेकडो निदर्शकांना अटक केली. बळाचा वापर करून आंदोलन मोडून काढले.

आ. रवी राणा यांची पत्नी खा. नवनीत राणा यांनी यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. रविवारी मुंबईत जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊ व नंतरही मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’समोर (Matoshri agitation) आंदोलन करू, असा इशारा दिला. “हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मी अनेकदा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करावी, अशी विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.” असे त्या म्हणाल्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER