सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ ; नाना पटोलेंची संजय राऊतांवर टीका

Nana Patole - Sanjay Raut

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावण्यात आले आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे . सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे ठरवू’ असं सूचक विधान करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेच्या सामनामध्ये काय लिहिले आहे, ते बघून सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे योग्य प्रकार ठरवू, असा टोला नाना पटोले यांनी राऊत यांना लगावला.

भाजपचे आमदार आशिष शेलार सांगायचे जे पी नड्डा यांनी राहुल गांधी परिवार टीका केली, 70 वर्षांत काँग्रेसने काय केले, काँग्रेसने देश निर्माण केला आहे पण आता पंतप्रधान मोदी स्वत:चे घर उभे करत आहे, असा टोलाही पटोले यांनी भाजपला लगावला.

संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्ष देखील नाही. त्यांचा सामना पेपर वाचणं देखील आम्ही बंद केलं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खटके पडायला सुरूवात झाली आहे. नाना पटोलेंच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युतर दिलं आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधी सामनाची दखल घेतात, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही, हा सामनाने उपस्थित केलेलाच प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला, असं देखील संजय राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button