विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया : मंत्री हसन मुश्रीफ

Hasan Mushrif.jpg

कोल्हापूर : वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या संकल्पनेतून ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ (My family – my responsibility) हे अभियान हाती घेतले आहे. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या अभियानाचा पहिला टप्पा, १२ ऑक्टोबर २४ ऑक्टोबर या अभियानाचा दुसरा टप्पा आहे. २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला कोरोनारुपी रावणाचे दहन करूया, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. जनतेने आणि कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सज्ज व्हा, अशी प्रेरणाही मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

राज्य शासननाच्या ‘माझ कुटुंब-माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी झाला. कागल, मुरगूड शहरासह तालुक्यातील ८६ गावात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, घरोघरी सर्व्हे करून अजून बाहेर न पडलेले रुग्ण शोधून त्यांना उपचारापर्यंत आणण्याशिवाय पर्याय नाही. शासनाने आणि विशेष करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पुढे आलेला हा कार्यक्रम असून मंगळवारपासून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. आज अनेक व्यक्तींना लक्षणे दिसून येताहेत मात्र असे लोक घाबरून उपचार घेण्यास पुढे येत नाहीत. जे आरोग्यदूत म्हणून सर्व्हे करणार आहेत, त्यांनी न घाबरता काम करावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER