सपाला जशास तसे उत्तर देऊ – मायावती

- राज्यसभेच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने संतापल्या

Mayawati & SP

लखनौ :- उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या नेत्या मायावती सपावर संतापल्या. म्हणाल्या – विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू.

बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज (Prakash Bajaj) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यांनी समाजवादी पार्टीचे रामजी गौतम यांच्याविरूद्ध उमेदवारी दाखल केली होती. बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या. आमच्या सात आमदारांना फोडले हे समाजवादी पार्टीला महागात पडेल, असा इशारा मायावती यांनी दिला.

उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागा पुढील वर्षी जानेवारीमध्ये रिक्त होत आहेत. यातील सहा जागांवर समाजवादी पार्टीचे आमदार आहेत. दोन आमदार बसपा व तीन आमदार भाजपाचे आहेत. पक्षांच्या संख्याबळानुसार ११ जागापैकी ८ ते ९ जागा भाजपा जिंकण्याची शक्यता आहे. एक जागा समाजावादी पार्टी सहज जिंकू शकते. दुसऱ्या जागेवर समाजवादी पार्टीला अपक्ष उमेदवारांसह इतर पक्षांची मदत घेने आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER