सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा; अजित पवारांचे आवाहन

Ajit Pawar-Veer Savarkar

मुंबई :- आज विधानसभेच्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव प्रस्ताव मांडण्यासाठी भाजपाने आग्रह धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी लावून धरली. मात्र विधानसभाध्यक्षांनी हे नियमात बसत नसल्याचे कारण पुढे करत विरोधकांची मागणी फेटाळून लावली. दरम्यान, सावरकरांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विधान सभागृहात केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाची मागणी विरोधी पक्ष भाजपाने लावून धरली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले. ‘सावरकर यांनी दिलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. त्यांनी मांडलेले काही मुद्दे विज्ञानवादी होते. सावरकरांविषयी मतमतांतरे असू शकतात. जितके व्यक्ती तितकी मते आपल्याकडे असतात. मात्र म्हणून सावकरांचे योगदान नाकारता येत नाही. ’ असे अजित पवार म्हणाले.

आज विरोधी पक्षाकडून सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर पुढे काय कारवाई झाली, याबाबत काही पाठपुरावा झाला आहे का? आता सावरकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, असे अजित पवार म्हणाले.

सावरकरांचे स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कोणालाही नाकारता येणार नाही’ – अजित पवार


Web Title : ‘Everyone should try to give Savarkar’ Bharat Ratna’ – Ajit Pawar

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)