शरद पवारांचे नातीला धडे; सुप्रिया यांच्यानंतर रेवतीची राजकीय वाटचाल?

Revati Sule - Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख राजकारणातले चाणक्य म्हणून केली जाते. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय घराणे म्हणून पवार कुटुंबीयांकडे बघितले जाते. मुख्यमंत्रिपदापासून तर केंद्रीय मंत्री म्हणून पवारांनी काम बघितले आहे. सोबतच मुलगी सुप्रिया सुळे यादेखील पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकीय वारसा जपत आहेत. पवारांची तिसरी पिढीही राजकारणात उतरली आहे. नातू रोहित पवार (Rohit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यातच आता एका नव्या सदस्याचं राजकारणात आगमन होऊ शकते. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती ही काही दिवसांपासून पवारसाहेबांसोबत दिसू लागली आहे. पवारांकडून तिला राजकीय धडे मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे.

रेवती सुळे (Revati Sule) हिने ट्विटरवरून एक फोटो शेअर केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या फोटोत रेवती कार चालवत असून बाजूला बसलेले शरद पवार तिला काही सूचना देत असल्याचे दिसत आहे. आई सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यानंतर आता मुलगी रेवती हिची वाटचाल राजकारणाकडे वळली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे आजोबा शरद पवार यांच्यासोबत ती नेहमीच दिसते. त्यामुळे आता शरद पवार नातीलाही राजकारणात उतरवणार अशी चर्चा रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER