केळीच्या ‘साली’ पासून वर्षाला ‘दिड कोटी’ कमावणारा पठ्ठ्या !

PM Murugesan

तमिळनाडूच्या मदुराईमधील मोलाक्कल गावात राहणाऱ्या ५७ वर्षीय पीएम मुरुगेसन हे केळीच्या फायबर पासून दोरखंड आणि इतर उत्पादने बनवत आहेत. त्याचे हे इकोफ्रेंडली उत्पादने भारतासह जगभरात पोहचत आहेत. आंतराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख त्यांनी या व्यवसायातून निर्माण केलीये. केळीच्या फायबरपासून दोऱ्या बनवण्याचे यंत्र त्यांनी बनवलं. त्यातून ते करोडोचे उत्पन्न मिळवत आहेत.

वडीलांसोबत काम करत त्यांनी शेतीतल चांगल ज्ञान मिळवलं. आठवीत असताना त्यांना शाळा सोडावी लागली. आर्थिक परिस्थीती वाईट असल्यामुळं त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. शेती करत असताना यातले अनेक बारकावे त्यांनी हेरले. अनेक संकटांना तोंड दिलं. नुकसानही सहन केलं. शेतीमुळं व्यवसायात रिस्क घेण्याची क्षमता मुरगेसन यांच्यात निर्माण झाल्या होत्या.

शेतीतून म्हणावं असं उत्पन्न मिळत नव्हतं. काहीतरी नवीन करावं अशी त्यांची इच्छा होती. अनेक नव्या गोष्टींचा त्यांनी प्रयत्न केला पण पदरी निराशा आली. एकदा गावात फुलांची माळ विणणाऱ्यानं फुल विणताना धाग्याऐवजी केळीच्या फायबरचा उपयोग केलेला त्यांनी पाहिला आणि त्यांना आयडीया मिळाली. केळीचे फायबर म्हणजे केळीपासून निघणारा कचरा. त्यापासून उत्पन्न घेण्याचा त्यान निर्णय घेतला.

कचऱ्यात शोधला खजिना

२००८ला मुरगेसननं फायबरपासून दोर बनवायला सुरुवात केली. फुलांच्या हारात धाग्याऐवजी केळीच्या खुटापासून जो तंतूमय कचरा निघायचा ज्याला फायबरही म्हणलं जातं. त्यापासून दोरखंड बनवूण विकण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांशी चर्चा करुन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली.

केळीच्या खोडाचे बाहेरचे आवरण काही दिवसांनंतर आपोआप बाजूला होत. शेतकरी त्याला कचरा समजून फेकून देतात पण मरुगेसन यांनी याच कचऱ्यात खजिना सोधला. नारळाच्या कचऱ्यापासून दोर बनवणाऱ्या यंत्राचा वापर करुन दोरी बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या यंत्राचा काही उपयोग झाला नसला तरी नेमक्या कोणत्या पद्धीच्या यंत्राणे हे काम तडीस नेणं शक्य आहे. हे त्याला समजलं. शेवटी जुन्या सायकलच्या रीमचा उपयोग करुन स्पिनींग यंत्र त्यांनी बनवलं. त्यांच हे यंत्र अत्यंत स्वस्त आणि कामासाठी योग्य होतं.

यंत्र बनवण्यासाठी करावा लागला संघर्ष

यंत्राच्या प्रक्रियेतून जे काही उत्पादनं बनवली जाता ते बाजारात विकण्यासाठी अनुकुल आहेत. दोरीच्या गुणवत्तेवर त्यांनी सर्वाधिक काम केलं. यासाठी त्यांनी निरंतर यंत्रामध्ये बदल केले. दीड लाखांच्या खर्चानंतर त्यांचे यंत्र बनून तयार झालं. ही मशिन बनल्यानंतर ‘बायोटेक्नोलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टेंट काउंसिल’ (BIRAC)सोबत त्यांनी संपर्क साधला. त्यांनी गावात येवून यंत्राची पहाणी केली आणि योग्य ती मदत केली. त्यांनी यंत्रात आवश्यक ते बदल सुचवले आणि इतर शेतकऱ्यांनाही हे यंत्र वापरण्याचा सल्ला दिला.

या यंत्राच्या मदतीने त्यांच काम तर चालायचं पण अनेक गोष्टी अवघड होत्या. उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी यंत्रामध्ये अनेक बदल करणे गरजेचे होते. म्हणजे या यंत्राद्वारे दोरखंड तर बनायचे पण त्यांना एकत्र जोडणं शक्य नव्हतं.

२०१७ला त्यांनी ऑटोमॅटीक दोरखंड बनवणारी मशिन खरेदी केली. या मशिनची विशेष गोष्ट ही होती की दोन दोऱ्या एकत्र जोडण्यासोबत दोरी बनवण्याचे ही काम करायची. आधीच्या यंत्रातून २५०० मीटर दोरखंड बनायचा तर नव्या मशिनच्या सहाय्याने ही क्षमता १५ हजार मीटर पर्यंत वाढली.

व्यवसायाला सुरुवात

मुरुगेसन यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. पाच लोकांना घेवून सुरु झालेल्या या उद्योगात आज ३५० मजदूर योगदान देतायेत. गावात रोजगार निर्माण झालाय. अनेक महिला यातून कमाई करतायेत. इथं तयार होणारा कच्चामाल त्या घेवून जातात आणि त्यापासून चटई, टोकरी, पिशव्या बनवून देतात. विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातला हिस्सा त्यांना मिळतो. मुरगेसन दरवर्षी ५०० टन फायबर वेस्टवर प्रोसेसिंग करुन दरवर्षी १.५ कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत.

अनेक पुरस्कारांनी केलंय सन्मानित

त्यांच्या या अविष्कारासाठी सात राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलय. केंद्राच्या लघू उद्योग मंत्रालयाकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आलंय. पुरस्कारापेक्षा मुरगेसन यांन या गोष्टीचा आनंद जास्त आहे की, त्यांच्यामुळ गावात उद्योग निर्माण झाला. लोकांना जीवनमान उंचवायची संधी मिळाली.

उद्योग व्यवसायात प्रगती करु पाहणाऱ्या युवकांसाठी मुरगेसन प्रेरणेचा स्त्रोत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER