आता हॉटेल सुरू करण्यासाठी १० पेक्षा कमी परवानग्या : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray.jpg

मुंबई :- राज्यातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस (Ease of doing business) अंतर्गत लागणाऱ्या विविध परवानग्यांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतो. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण बैठकीला आदित्य ठाकरेंसह पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER