औरंगाबादेत सिडको परिसरात बिबट्या घुसला

leopard attack on Ganeshgule sarpanch

औरंगाबाद : शहरात सिडको एन-१ येथील काळ्या गणपती मंदिराच्या मागे असणाऱ्या वसाहतीतील एका भागात बिबट्या घुसला असल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी पोहोचल्याचे ही समजते आहे. परंतु बिबट्या बाबतच्या कुठल्या पुढील तपशील बाबत अजून माहिती समोर आलेली नाही. सकाळीच समोर आलेल्या या घटनेमुळे परिसरात आणि स्थानिक नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.