रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Accident OF Leopard

पुणे : शिरूर-भीमाशंकर राज्य मार्ग क्रमांक- ५४ वरील बुरसेवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथे रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक बसल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. आज गुरुवारी पहाटे ही घटना घडली. पाणवठ्याच्या शोधात हा बिबट्या रस्ता ओलांडत असावा व त्याच दरम्यान अपघात झाला असावा, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. चासकमान धरण परिसरातील बुरसेवाडी परिसरात घनदाट जंगल असून, या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा संचार असतो. या परिसरात चासकमान धरण जलाशय असल्याने पाण्याच्या शोधात व भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येत असतात.

यातूनच बिबट्याला अपघाताला सामोरे जावे लागले असावे, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. गुरुवारी सकाळी बिबट्या रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडला असल्याचे पाहून ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले. वनपाल नितीन विधाटे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. वैद्यकीय तपासणी करून मृत बिबट्याला ताब्यात घेण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER