कुत्र्यांना घाबरून बिबट्या झाडावर लपला !

leopard-climbing-on-tree-after-stray-dogs.jpg

सावंतवाडी :- कुत्रा ही बिबट्याची आवडती शिकार आहे. बिबटे गावात घुसून कुत्र्यांची शिकार करत असतात. पण, जवळच्या कारिवडे गवळीवाडी येथे कुत्रे बिबट्याच्या मागे लागले आणि घाबरून बिबट्या झाडावर जाऊन लपला!

कारिवडे गवळीवाडी येथील भालेकर यांना सकाळी त्यांच्या वाडीत कुत्र्यांच्या भुंकण्याचा गोंधळ ऐकू आला. कुत्रे एका नारळाच्या झाडाला कोंडाळे करून, झाडावर पहात भुंकत होते. भालेकरयांनी जाऊन पाहिले तर एक बिबट्या झाडावर सुमारे २० फूट उंचीवर बसला होता.

नारळाच्या झाडावर बिबट्या बसला आहे ही माहिती गावात पसरल्यानंतर भालेकरांच्या वाडीत लोकांची गर्दी झाली. वनखात्याला ही माहिती मिळाल्यानंतर बिबट्याची सुटका करण्याची मोहीम सुरू झाली. पोलिसांनी लोकांना वाडीच्या बाहेर काढले. कुत्र्यांनाही हाकलले. वाडी पूर्ण रिकामी झाल्यानंतर पोलिसांनी काठ्या हलवून बिबट्याला हुसकावले. बिबट्या झडावरून उतरून जंगलात पळून गेला.

कोल्हापूरात अतिक्रमण विरोधी कारवाईचा जोर