विधान परिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, शिंदे आणि भिंगे नावे निश्चित

Khadse & Shinde & Shetty & Bhinge

मुंबई : विधानपरिषदेच्या नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे देण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Eknath Khadse), राजू शेट्टी (Raju Shetty), गायक आनंद शिंदे (Anand Shinde) आणि यशपाल भिंगेंना (Yashpal Bhinge) संधी दिल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला आणि यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.

आज संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

आनंद शिंदे हे प्रसिद्ध गायक असून महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. ते दलित समाजातून आहेत. ते रिपब्लिकन चळवळीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन दलितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मोठी राजकीय शक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे वंचितची ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल.

शपाल भिंगे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडून २०१९ ची लोकसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध लढवली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER