
नागपुर : पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांनी पहिल्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. वंजारी यांना ९९४५ आणि भाजपाचे संदीप जोशी यांना ८४२३ मते मिळाली आहेत. नितेश कराळे यांना ३४०४ मते मिळाली असून इतरांना २२८५ मते मिळाली आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला