धानपरिषद उपसभापती निवडणूक: भाजपकडूनही उमेदवारी अर्ज दाखल

Devendra Fadnavis

मुंबई : कोरोनाचं (Corona) संकट आणखी गडद होत असतानाच राज्यात विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणार उतरवला. महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे या मैदानात असणार आहेत, तर भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावलं आहे. काही आमदार हे आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या दोन आमदारांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे.

दुसरीकडे आमदार कपिल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती, भाजप त्यांना पाठिंबा देणार होतं पण आता भाजपने आपला स्वतंत्र उमेदवार दिल्याने एक वेगळी लढत बघायला मिळणार आहे. भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे. तर महाविकासआघाडी मधील तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय. त्यामुळे प्रथम दर्शनी नीलम गोऱ्हे यांचा विजय सुनिश्चित वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER