विधान परिषद : काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचितचे उमेदवार पळवले; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar

अकोला : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे जी नावे मंजुरीसाठी पाठविली यात काँग्रेसच्या कोट्यातून कलाकार आणि गायक अनिरुद्ध वनकर आणि राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची नावे आहेत. हे दोन्ही नेते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत.

यावरून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोमणा मारला – काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत म्हणून वंचितच्या उमेदवारांना पळवले! प्रा. डॉ. यशपाल भिंगे वंचितकडून नांदेडमधून लोकसभा लढले होते. सव्वा लाखांच्या जवळपास मत घेतल्यानेच नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. गायक आणि कलाकार अनिरुद्ध वनकर यांनी चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघासाठी विधानसभा लढवली होती. या दोन्ही नेत्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या गळाला लावल्याने प्रकाश आंबेडकर काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकर म्हणालेत, यशपाल भिंगे आणि अनिरुद्ध वनकर या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.

मात्र, या दोघांचेही राजकारण औटघटकेचे आहे. त्यांच्या जाण्याने ना पक्षाला खिंडार पडले, ना पक्षाचे नुकसान झाले, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. अनेक जण मला सोडून गेलेत. मात्र, दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्या नेत्यांची उपयुक्तता संपली, याची आंबेडकरांनी आठवण करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER