शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षेवरून गदारोळ; विधानसभेचे काम स्थगित

Devendra Fadnavis

मुंबई :- अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात विरोधी पक्षानी आक्रमक घेतली. यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहाबाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला की, ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. एक नवा पैसा शेतकऱ्याला दिला नाही. गाजावाजा करून कर्जमाफी केली. मात्र दोन महिन्यांत केवळ १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी ४०० महिने लागतील!

ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील ३५ टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक सुरू आहे. दुसरीकडे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. आमच्या महिला आमदारांनी आज सभागृहात निषेध नोंदवला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि महिलांवरील अत्याचार थांबावावे, यासाठी सभागृहाचं कामकाज आम्ही बंद पाडले, असे फडणवीसांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आज संध्याकाळी ६ वाजता आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्रे पत्र लिहिली आहेत. ती पत्रे  राज्यपालांकडे सोपवणार आहोत. शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते आहे, ते राज्यपालांना सांगणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपा आक्रमक


Web Title : The state government cheated the farmers – Devendra Fadnavis

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)