शेतकरी आंदोलनात डावे आणि माओवाद्यांची घुसखोरी – गोयल यांचा दावा

Piyush Goyal

नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन आता शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. त्यात डावे आणि माओवाद्यांनी घुसखोरी केली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी शनिवारी केला.

विविध आरोपांवरून अटक करण्यात आलेल्या विचारवंत आणि कार्यकर्त्यांची सुटका करावी, अशी मागणी करणारे फलक शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी झळकले. त्याचा संदर्भ घेऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारीच शेतकऱ्यांनी समाजविरोधी घटकांना थारा देऊ नये, असे आवाहन केले होते.

आज गोयल यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणालेत, आंदोलन शेतकऱ्यांचे राहिले नाही. देशविरोधी आणि अवैध कारवायांबद्दल गजाआड करण्यात आलेल्यांची सुटका करण्याची असंबद्ध मागणी शेतकरी आंदोलनात होते आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे, असे त्यांनी पुन्हा सांगितले.

देशभरातील शेतकऱ्यांच्या लाभासाठीच केंद्रीय कृषी कायदे आणले गेले आहेत. त्या कायद्यांमुळे शेतमालासाठीची किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) व्यवस्था धोक्‍यात येणार असल्याचे चुकीचे चित्र रंगवले जात आहे, असा आरोप गोयल यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER