वो करे तो लीला, हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह! – इम्तियाज जलील

PM Modi-Imtiaz Jaleel

मुंबई :- देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने सरकारकडून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र, अनेक ठिकाणी यात्रा, राजकीय मेळाव्यांसह धार्मिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. नुकतेच हरिद्वार येथे कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीने सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावरून MIMचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“वो करे तो लीला… हम करे तो… जुर्म! वाह मोदीजी वाह..!!” असे जलील यांनी ट्विट केले. सोबत कुंभमेळ्यातील गर्दीचा व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे. सोबतच “जर माझ्या शेजारचे छोटे दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला जात असेल, तर विमानतळांवरील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे का सुरू आहेत? नुकतीच मुंबई विमानतळावर ग्राहकांसह सर्व दुकाने सुरू असल्याचे पाहिले!” असेदेखील जलील यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील संभाव्य लॉकडाउनबाबात इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. हे नेते गरिबांच्या हिताचा निर्णय घेणार नाहीत, त्यामुळे आता गरिबांनाच स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल, लढावे लागेल, असे म्हणत त्यांनी औरंगाबादमधील लॉकडाउनच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button