कोकणातील गुरखा मजुरांना परतीसाठी रेल्वे सोडा – बाळ माने

Bal Mane

रत्नागिरी :- कोकणामध्ये हापूस आंबा बागांच्या विविध कामांसाठी हजारो मजूर दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान कोकणात दाखल होतात. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा बागांच्या देखभाल, रखवाली व आंबा व्यवसायातील हंगामी कामासाठी नेपाळमधून आलेल्या हजारो गुरखा मजुरांसाठी मडगाव ते मथुरा अशी विशेष गाडी रेल्वेने सोडावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार  बाळ माने यांनी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली आहे.

कोरोना लॉकडाऊनमुळे या मजुरांना परत जाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. दरवर्षी ३१ मे ते १५ जून या कालावधीत हे सर्व मजूर कोकण रेल्वेने मथुरा रेल्वेस्थानकापर्यंत जाऊन तिथून बसने मायदेशी रवाना होतात. लॉकडाऊनमुळे या मजुरांना मथुरापर्यंत जाण्याकरिता विशेष रेल्वेची गरज आहे. ७ जूननंतर गरजेनुसार गाड्या सोडाव्यात, अशी मागणी भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी रेल्वेमंत्री व कोकण रेल्वेचे सीएमडी यांच्याकडे केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER