सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, ते मी पाहीन, फडणवीसांचे सूचक विधान

Devendra Fadnavis - Maharastra Today

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणीच्या प्रचाराने वेग धरला आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस पंढरपूरच्या दौऱ्यावर असून, विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ कासेगाव इथे झालेल्या सभेत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज महाराष्ट्रातील जनता त्रस्त झाली आहे. कोरोना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्याची किंमत राज्यातील जनता मोजत आहे. मात्र आता या सरकारला बदलण्याची वेळ आली आहे. सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, ते मी पाहीन, फडणवीसांचे सूचक विधान फडणवीस यांनी केले.

ते म्हणाले, कोरोनाचं माहित नाही, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचा लॉकडाऊनचा निर्णय हा गोरगरीब जनतेचा जीव घेतोय. हातावर पोट असणाऱ्यांना कोणतीही मदत न करता लॉकडाऊन करून ठाकरे सरकारने त्यांना दुसरा पर्यायच सोडला नाही. या मृत्यूंना केवळ ठाकरे सरकार जबाबदार आहे. राज्यात सर्व काही आलबेल असल्याचं सोंग करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलतील का? आज तुमच्या आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या तडफदार कामगिरीमुळेच रुग्णांवर खुर्चीवर बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. या सरकारच फक्त वसुलीकडे लक्ष आहे. हे वसुली सरकार आहे.

ठाकरे सरकारच्या अकार्यक्षम आणि भोंगळ कारभारामुळे कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्राची अशी दयनीय अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ‘लोकशाही’ नसून ‘लॉकशाही’ सुरु आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात धक्कादायक प्रकार उघडकीस आला… बारामतीमधील सिल्व्हर जुबली इस्पितळात कोरोना रुग्णावर खुर्चीत बसवून उपचार केले जात आहेत. इतके दिवस महाराष्ट्र सोडा तुमच्या स्वतःच्या मतदार संघात तरी काय तयारी केली तुम्ही अजित पवार ?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेलेत. म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. १५ वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मिटर कट करुन ५-५ हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखळं जात होतं. पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

सरकारमध्ये आले तेव्हा बांधावर जावून सांगायचे ५० हजार देऊ. पण २ हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करु म्हणले, पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. शेतमालाला एफआरपी फक्त मोदी सरकारमुळे मिळत आहे. हजारो रुपयांचे पॅकेज मोदी सरकारनं दिले. मोदी सरकार शेतकऱ्यांची चिंता करतं आहे, असा विश्वासही फडणवीसांनी दिला. या भागात ५ हजार कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या, ३५ गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही फडणवीसांनी केला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रेमडेसिव्हीर वाटत आहेत. त्यांनी काय स्टॉक करुन ठेवला आहे काय? असा गंभीर सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button