‘मुख्यमंत्रीजी घर सोडा, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल’ – बाळा नांदगावकर

bala nandgaonkar-CM Thackeray

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. यावरुन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली आहे. “मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही,” अशी टीका बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली आहे.

“मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा आणि त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल,” असा टोला बाळा नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

दरम्यान, परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भाचा आणि कोकणच्या काही भागातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. कुठे काढणी झालेल्या सोयाबीनच्या हुंडी वाहून गेल्या. तर कुठे सोयाबीनला जागेवरच बुरशी लागली. अनेक भागात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं उभा ऊस आडवा झाला. फुलं, फळबागांचं मोठं नुकसान झालं. भात शेती पुर्णता नष्ट झाली. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर वाया गेललं पीक पाहत अश्रू ढाळण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. अशावेळी मुख्यमंत्री महोदयांनी घराबाहेर पडत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याची मागणी आता विरोधकांकडून करण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER