दिलीप कुमार झाले ‘रहमान’ : कसे बनले संगीतकार? का बदलावा लागला धर्म?

AR Rahman

बॉलिवूडमध्ये गीतकार आणि संगीतकारांची कमतरता नाही; परंतु येथे असे हिरे आहेत, ज्यांचे आवाज आणि संगीत कानात येऊ लागते. तथापि, एक आवाज असा आहे जो थेट हृदयापर्यंत पोहचतो आणि ज्यांचे संगीत मन शांत करते. होय, आम्ही
बोलत आहोत संगीतकार ए.आर. रहमानबद्दल, ज्यांनी भारतीय संगीताला परदेशात नेले. ६ जानेवारीला ए.आर. रहमान यांचा ५४ वा वाढदिवस आहे. तर मग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया. ए.आर. रहमान यांनी बॉलिवूडला केवळ आपला आवाज आणि संगीतच नाही तर हृदयदेखील दिले आहे.

त्यांचे देशातच नव्हे तर परदेशातही लाखो चाहते आहेत. रहमान यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह जगातील सर्वांत प्रसिद्ध ऑस्कर पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. ६ जानेवारी १९६७ रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या ए.आर. रहमान यांचे पूर्ण नाव अल्लाह रक्खा रहमान आहे. तथापि, त्यांचे खरे नाव ‘दिलीप कुमार’ होते जे त्यांना आवडत नव्हते. रहमान यांना नेहमीच आपले नाव बदलवले पाहिजे अशी इच्छा होती; परंतु  संधी मिळत नव्हती.

आपल्या आवाजाने लोकांच्या अंत:करणात राहणाऱ्या रहमान यांना वडिलांकडून संगीत वारसा लाभला आहे. त्यांचे वडीलही संगीतकार होते. तथापि, वडिलांचे निधन झाले तेव्हा रहमान नऊ वर्षांचे होते. वडिलांचे निधन होताच  रहमान यांची स्थिती हलाकीची झाली. घरी ठेवलेली वाद्येही विकावी लागली. तथापि, रहमान यांच्या आईचा सुफी संत पीर करीमुल्लावर पूर्ण विश्वास होता. त्यांचा हिंदू धर्मावरही खूप विश्वास होता.

रहमान यांनी मुलाखतीत सांगितले होते की, वडिलांचे निधन झाल्यानंतर सुमारे १० वर्षांनी ते कादरी साहेबांना भेटायला गेले होते. ते आजारी होते. त्या काळात त्यांच्या आईने कादरी साहेबांची खूप सेवा केली. पुढे रहमान म्हणाले, ‘मला समजले की, पुढे जाण्यासाठी मार्ग निवडणे, हाच सुफीवादाचा मार्ग आहे. ’ संगीत त्यांच्या रक्तात होते आणि म्हणूनच त्यांनी सुफी इस्लामला स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा जास्त गाणी गायली आणि संगीत दिले, ज्यामुळे त्यांनी सर्वांनाच वेड लावले.

नाव बदलण्याच्या मुद्द्यावर बोलताना रहमान यांनी स्वतःचे नाव आवडत नसल्याचे सांगितले होते. त्यांचे मत होते की, नाव बदलणे चांगले आहे. एकदा एका ज्योतिष्याजवळ जाऊन त्यांनी आपल्या बहिणीची कुंडली दाखविली आणि नाव बदलण्यास सांगितले. त्यांनी रहमानला आपले नाव अब्दुल रहमान किंवा अब्दुल रहीम असे ठेवायला सांगितले. आईला त्यांचे नाव अल्लाह रक्खा ठेवायचे होते. त्यांना रहमान हे नाव आवडले आणि मग त्यांनी मूळ नाव बदलून ए.आर. रहमान ठेवले. आज ए.आर. रहमान यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER