शब्दाने शब्द कसा वाढवायचा ते राजकारण्यांकडून शिकावे ? राणेंचा टीकेचा मोर्चा आता अजित पवारांकडे…

Ajit Pawar-Nilesh Rane

मुंबई :- राष्ट्रवादीवर एकाच वेळी अचानक संकट यावे असा काहीसा आताचा काल पाहायला मिळाला. धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) बलात्काराचा आरोप तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या जावयाकडे ड्रग्ज संदर्भात मिळालेले पुरावे यामुळे कोंडीत सापडलेल्या राष्ट्रवादीवर पहिला वार राणे पुत्रांनी केला. त्यावर अजित पवार यांनी राणेंचे पुत्र डोक्यावर पडलेत असे विधान केले होते. त्यानंतर लगेच राणे पुत्रांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधणे सुरू केले. घमेंड उतरवणे ते आता निलेश राणेंनी (Nilesh Rane)अजित पवारांच्या (Ajit Pawar) कोरोनाची लस घेण्याच्या विधानावरूनही निशाणा साधला आहे.

राज्यात कोरोनाचे लसीकरण (Corona Vaccine) सुरू झाले आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर काही नेते अविश्वासार्ह काही कमेंट करतानाही दिसत आहेत. मंत्र्यांनी पहिले लस का नाही घेतली असेही प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्री केव्हा कोरोनाची लस घेणार हा माध्यमांसाठी मोठा विषय बनला आहे. त्यातच माध्यमांनी संधी मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण लस केव्हा घेणार या प्रश्नावर पवारांनी परवानगी मिळाल्यानंतर मी लस घेईन, असे अजितदादांनी सांगितले होते.

अजित पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी खोचक शैलीत ट्विट केले आहे. कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा, असा सवाल निलेश राणे यांनी अजितदादांना विचारला आहे. त्यामुळे शब्दाने शब्द कसा वाढवायचा ते राजकारण्यांकडून शिकावे ? असे म्हट्यास वावगे ठरणार नाही. राणें पुत्रांच्या टिकेचे आसूड महाराष्ट्राने पाहिले आहे. वडील नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर राणे पुत्र सेना व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) टिकेची एकही संधी सोडत नाहीत.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं वेगळं; पण करणार कोण?- शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER