पराभवातूनही शिकावे; मोदींची पदाधिकाऱ्यांना शिकवण

Maharashtra Today

नवी दिल्ली : देशभरातील ५ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांनंतर प्रथमच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवासस्थानी झाली. सर्व सरचिटणीस उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. या संदर्भात मोदी म्हणालेत – पराभवातूनही शिकायला हवे.

ही बैठक सुमारे ५ तास चालली. मोदी म्हणाले की, पराभव असो वा विजय भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्याचा सविस्तर आढावा घ्यायला हवा. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी योग्य तयारी करणे शक्य होईल. २०१९ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पश्चिम बंगालमध्ये चांगले यश मिळवले होते. तरीही विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने चांगले पुनरागमन केले आणि विजय मिळवला.

सेवा ही संघटन कार्यक्रमाचा आढावा

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्याचा सल्लाही मोदींनी पदाधिकाऱ्यांना दिला. भाजपायाच्या नेत्यांनी स्थानिक भाषांचा उत्तमपणे वापर आणि विस्तार करावा, असे मोदीं म्हणालेत. भाजपाने सुरू केलेल्या ‘सेवा ही संघटन’ कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button