निद्रानाशाच्या समस्येवर उपाय शोधण्याआधी झोपेबद्दल माहिती घ्या!

Insomnia - Maharashtra Today
Insomnia - Maharashtra Today

भारतात झोप न लागण्याच्या समस्येला कवींनी प्रेमाशी जोडलं. परंतू ही समस्या कवींच्या समजुतीच्या अगदीच विपरीत आहे. आपल्यापैकी ५५ टक्के लोक झोपेविषयक समस्येने बेजार आहेत. झोप न लागणं या समस्येला भारतात आजार मानलं जात नाही. अनेक डॉक्टरांचा देखील हाच समज आहे. रात्री उशीरा झोप येते, रात्रभर झोप येत नाही, झोपोत असताना अचानक झोप मोड होते. पुर्ण झोप झाल्यानंतरही पुढचा दिवस आळसात जातो. अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. यावर उपाय शोधताना सर्वात आधी आपण झोपेबद्दल जाणून घेतलं पाहिजे.

झोपेचे चिकित्साशास्त्र (Sleep Therapy) बरंच रंजक आहे. एखाद्याला झोप का येते? समजा डोळे बंदच केले नाहीत तरी झोप येईल का? अनेकांनी ही कथा ऐकली असेल की अभ्यासाची गोडी असलेला एक युवक त्याच्या पापण्या छाटून टाकतो. त्यामुळं त्याला कधीच झोप आली नाही. बालवयात आपण पटकन गोष्टींवर विश्वास ठेवयाचो परंतू आता या गोष्टींमध्ये तथ्य वाटत नाही. डोळे बंद करण्याचा आणि झोपेचा खरच काही संबंध आहे का? असा ही प्रश्न आपल्याला पडायला हवा. अनेकदा झोप न येणं डिप्रेशनच लक्षण मानलं जातं. व्यवस्थित झोप झाली नसल्यानं शारिरीक समस्या जाणवत असल्याचंही अनेक जण सांगतात. झोपे विषयी आपल्यामध्ये बरेच समज गैरसमज आहेत.

माणसाच्या मेंदूत सातत्याने ‘इ.इ.जी’ म्हणजे विद्यूत संचार सुरु असतो. जागृत असाताना मेंदूचा इ.इ.जी. वेगळ असतो. निद्रेत असाताना या इ.इ.जी.चा वेग आणि गती मर्यादित असते. यांचा वेग जितका कमी तितकी झोप गडद असं सुत्र ठरलेलं आहे. झोपताना तुमच्या मांसपेशी मेंदू शिथील करतात. हा इलोक्ट्रोआक्यूलोग्राम म्हणजे इ.एम.जी. आपण रेकॉर्ड करु शकतो. रात्री झोपेत मध्ये मध्ये डोळे काही वेळेसाठी उघडतात आणि तितक्याच वेगात मिटतात. झोपेत डोळे उथळ होतात त्याला रॅपीड आय मुव्हमेंट स्लीप ‘आर. आय. एम.’ असं म्हणतात. इतरवेळी झोपेत असताना डोळे जास्त हलचाल करत नाहीत तेव्हा झोपेचं प्रमाण सर्वाधिक असतं. याला नॉन रॅपीड आय मुव्हमेंट स्लीप म्हणजेच ‘नॉन आर. इ. एम’ देखील म्हणलं जातं. नवजात बालकात ५० टक्के झोप ही आर.इ.एम. असते. त्यामुळं त्यांची वारवारं झोप मोड होत असते.

साधारण वयोगटातील माणसाची झोप साधारणतः सात ते आठ तासांची असते. वृद्ध आणि बालकांमध्ये याचे प्रमाण वेगळे असते. त्यांची वारंवार झोप मोड होत असते. झोपेचे प्रामुख्याने चार टप्पे असतात. चौथ्या टप्प्यातली झोपही फार गडद असते. यात इ.इ.जी. विद्यूत तरंग मंद असात. रात्रभर आर.इ.एम. आणि नॉन आर. इ. एम. मध्ये साधारण वयोगटातल्या लोकांची झोप सुरु असते.

परिणाम करणारे घटक

आहार, औषधं आणि झोपेची वेळ झोपेवर थेट परिणाम करते. झोपणे आणि जागे होणे या दोन्ही प्रक्रिया चेतनाभावी रसायनामुळं घडत असतात. कॉफी किंवा नाक मोकळे करण्याचे औषध घेतल्यानंतर झोप लागत नाही. बऱ्याचदा ताण कमी करण्यासाठी घेतलेल्या औषधांचा देखील झोपेवर परिणाम झाल्याचं जाणवतं. निद्रानाश (Insomnia) झालेल्या व्यक्ती अनेकदा मद्यपान करतात, झोप येण्यासाठी ते हे करत असतात. दारु पिल्यानंतर येणारी झोप ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत असते. त्यांच्या रेम झोपेचा कालावधी कमी असतो. झोप न येण्याच्या आजारालाच निद्रानाश असं संबोधलं जातं. काहींची झोप ही आठ ते दहा तासांची असून सुद्धा अपूरी वाटते याला कारण आहे झोपेच्या चारही टप्प्यांमधून त्यांना जाता न येणं. सलग झोपेनंतर उरलेले सर्व तास काम करण्यासाठी उत्साह येतो. डोळ्यावर झापड येत नाही. शुरगर, डिप्रेशन, पित्त, अर्धांगवायू, हाय ब्लड प्रेशर, स्मृतीभ्रंश अशा अनेक व्याधी कमी झोपेमुळं होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button