पायी वारीची मागणी फेटाळणारे आघाडीचे सरकार महाराष्ट्र द्रोही – आचार्य तुषार भोसले

Acharya Tushar Bhosale

मुंबई : राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना २० बसेस देण्याच्या निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) घेतला आहे. यावरुनआघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधले आहे. वारकरी संप्रदायाची मागणी फेटाळून वारीची परंपरा खंडीत करणारे महाविकास आघाडी सरकार हे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे, अशी घणाघाती टीका आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी केली आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात मुघलांच सरकार आहे, हे पुन्हा आता सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पायी वारीची परंपरा कायम राखण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राच्या माध्यमातून केली होती. तसेच वारकऱ्यांना संख्येत सर्व निर्बंध पाळून पायी वारी करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती. पण ती मागणी फेटाळून पुन्हा एकदा परंपरा खंडित करण्याचं काम ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे. हा वारकऱ्यांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आचार्य भोसले यांनी दिला आहे.

वारकरी संप्रदाय कुठल्याही परिस्थित मर्यादित संख्येत कोरोनाचे सर्व नियम पाळून पायी वारीची पंरपरा जोपसण्यावर ठाम आहे. यावरून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील. वारकऱ्यांचा अपमान करणारे इतक वाईट सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत दिसून आले नाही. मुघलाच्या आणि ब्रिटीशांच्या शासन काळातही वारीची परंपरा खंडीत झालेली नव्हती. पण ठाकरे सरकारने वारीची परंपरा खंडीत करण्याचे पाप केले. पायी वारीची परंपरा खंडीत करणार महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे महाराष्ट्र द्रोही सरकार असल्याची टीका आचार्य भोसले यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button