‘आघाडीतील नेत्यांकडेही रेमिडिसीवीरचा साठा, नवाब मालिकांनी यावरही बोलावे’; मनसेची मागणी

Nawab Malik - Akhil Chitre

मुंबई : काल सायंकाळी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा (Remdesivir) पुरवठा करणाऱ्या ब्रुक कंपनीच्या मालकाला पोलिसांनी त्यांच्या घरून ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशीही केली. केलेल्या या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अशातच आता मनसेनेही (MNS) या वादात उडी घेतली आहे. रेमिडिसीवीर इंजेक्शन्सचा साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडेही आहे, असा आरोप मनसेचे (MNS) नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी केला आहे.

अखिल चित्रे यांनी यासंदर्भात ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘रेमिडिसीवीर इंजेक्शन्सचा साठा मविआ आमदारांकडेही आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) त्याचे वाटपही करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबतही जरा बोलावे. तुमचे राजकारण बंद करा, जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button