आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार अन् शेतकऱ्यांना मदत केंद्राने करायची? – निलेश राणे

Nilesh rane-Sharad pawar

मुंबई :  परतीच्या पावसाने शेतक-यांच्या पिकावर पाणी सोडले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गहीवरला आहे. आघाडीचे सत्ताधारी दिग्गज नेते शेतकरी नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौ-यावर आहेत. या दौ-यावर माजी कासदार, भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

“महाविकास आघाडीचे नेते शेतीच्या बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार?”, असा खोचक सवाल निलेश राणे यांनी केला आहे (Nilesh Rane slam Maha Vikas Aghadi Government).

राज्यातील दिग्गज नेते पाऊस नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांचा मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतीच्या बांधावर जाऊन शरद पवार शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

कृषीमंत्री दादा भुसे सोलापूर जिल्ह्यात पाहणी करत आहेत. त्याचबरोबर मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारदेखील सोलापूर जिल्ह्यात पाहणी करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद दौऱ्यादरम्यान आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, असं सांगितलं. मात्र, यावर निलेश राणे यांनी टीका केली.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता असं झालंय, महाविकास आघाडीचे नेते बांधावर जाऊन फोटो काढणार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार”, असा चिमटा निलेश राणे यांनी ट्विटरवर काढला (Nilesh Rane slam Maha Vikas Aghadi Government)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER