
कोलकाता : सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून मोठ्या संख्येत नेते-कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. यावर टीका होते आहे. या टीकेला उत्तर देतांना पश्चिम बंगाल प्रदेश भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणालेत, भारतीय जनता पक्षाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि पक्षाला सत्ता संपादीत करण्यासाठी इतर पक्षांतील नेत्यांची गरज आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत घोष म्हणालेत की, या बाहेरच्या नेत्यांना पक्षात घेतले जात असले तरी पक्षातील जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलेले जाणार नाही. आम्ही सरसकट सर्वांनाच प्रवेश देत नाही. प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना पक्षात प्रवेश दिला जात आहे.
पक्षाची शिस्त आणि नियम-निर्बंध सर्वांनाच पाळावे लागतील, असे ते म्हणाले. पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी आणि पक्षाचा सत्तेचा दावा मजबूत करण्यासाठी बाहेरील पक्षाच्या लोकांची गरजच असते असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला