आंदोलनाची भाषा करणारे मराठा संघटनांचे नेते भाजपाच्या चाबीने चालतात : नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : मराठा संघटनांचे जे नेते आंदोलनाची भाषा करत आहेत ते भाजपाच्या (BJP) चाबीने चालणारे आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. ते चेंबूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चा येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. दरम्यान, याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात नवाब मलिक म्हणालेत, मराठा आरक्षण (Maratha Reservation) न्यायप्रविष्ठ असल्याने मोदी सरकारने कायदा करुन मराठा आरक्षण द्यावे.

मराठा क्रांती मोर्चाची आज (२९ नोव्हेंबर) रोजी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्यभरातील मराठा समन्वयक उपस्थित होते. सरकार मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला (Nawab Malik allegations on Maratha leaders).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER