मातोश्रीबाहेर आंदोलनापुर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांना अटक

Maratha Kranti Morcha
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मातोश्रीतून बाहेर पडण्याची गरज मराठा क्रांती मोर्चाने आधीच दिला होता इशारा

मुंबई :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थगित झाल्यापासून मराठा तरूण आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. हा आक्रोश मराठा तरूण अर्थातच सत्ताधारी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) काढत आहे.

आज मराठा क्रांती मोर्चाचे नेते मातोश्रीबाहेर आंदोलन करणार होते. मात्र, आंदोलनाच्या तयारीत असणा-या मराठा क्रांती मोर्च्यांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एमपीएससीची (MPSC) परिक्षा राज्य सरकारने रद्द करावी यासाठी हे आंदोलन होणार होते. परंतु, खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांची कारवाई करत मराठा क्रांती मोर्च्यांच्या (Maratha Kranti Morcha) नेत्यांना आंदोलनाआधीच ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विविध शैक्षणिक प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षांबाबत काही प्रश्न तयार झाले आहेत. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर केली आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करताना मराठा संघटनेचे नेते आबा पाटील यांनी या पुर्वीच केले होते. तसेच, राज्य सरकारने पाच ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्यावा. आम्ही त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देत आहोत. या काळात निर्णय घेतला नाही तर सहा तारखेला मुंबईत मातोश्रीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला होता. त्याप्रमाणे आज मराठा क्रांती मोर्चा मातो8ीबाहेर आंदोलन करण्याच्या तयारित होते. तत्पुर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

एवढेच नाही तर, या परीक्षा पुढे न ढकलता जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडण्यात येईल असा इशाराही मराठा समाजाने दिला होता. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता मातोश्रीतून बाहेर पडण्याची गरज आहे. मराठा समाजाशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात येणार आहे. असेही म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER